पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझे आवडते मराठी पुस्तक : बोलगाणी

अगदी हायस्कूल जीवनापासून मला वाचनाचा छंद आहे. मिळेल तेथून पुस्तक उपलब्ध करून मी माझा वाचन छंद जोपासला आहे. खर तर  वाचण्याचे विविध फायदे आहेत. रोजच्या धकाधकीच्या जगात आपल्या मनावर अनेक ताण तणाव असतात. ते विसरायचे असतील तर वाचन व संगीत यासारखा दुसरा पर्याय शोधून देखील सापडणार नाही. मला कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे सारे वाङमय प्रकार वाचावयास आवडतात.
नुकतेच माझ्या वाचनात मंगेश पाडगावकर यांचे बोलगाणी हे पुस्तक आले. मंगेश पाडगावकर यांचे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा वाचनीय खजिनाच. गिरकी, मुखवटे, अफाटराव, फुलपाखरू, नवा दिवस, तुझे गीत गाण्यासाठी, भटके पक्षी, सलाम, उत्सव, भोलानाथ अशी कितीतरी पुस्तके त्यांनी लिहली आहेत. बोलगाणी हे त्यापैकीच एक.
चाळीस वर्षाचा सहवास व सहप्रवास मनात साठवून विंदा करंदीकर, वसंत बापट याना प्रेमपूर्वक अर्पण केलेले हे पुस्तक. मौज प्रकाशनने प्रकाशित केले आहे. एप्रिल 1990 ला पहिली आवृत्ती तर नोव्हेंबर 2010 ला या पुस्तकाची 21 वी आवृत्ती प्रकाशित झाली. वासंती मुझुमदार यांचे मुखपृष्ठ आहे. 
तरीसुद्धा, मनमोकळे गाणं, आपल्या माणसाचं गाणं, तू प्रेम केलंस म्हणून, जगणं सुंदर आहे, चांदण, तिने लाजून होय म्हटलं, मन कस धुंद आहे, हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो, चरहाट, तुमचं काय गेल, शहाणं पणाच गाणं, म्हातारपणा वरच तरुण गाणं, श्वास, एकट असावस वाटत, आपलं गाणं आपण गाव, भास, माणूस केलंत तुम्ही मला, प्रेम म्हणजे प्रेम असत, गाण्यावरच बोलगाण, वेंगुर्ल्याचा पाऊस, दुपार, विदूषकाचे आत्मकथन आशा सुमारे 59 कविता या पुस्तकात समाविष्ट आहेत.
मनमोकळे गाणं या कवितेतून त्यांनी जीवनातील सार दुःख विसरायला सांगितले आहे. मन मोकळे करण्यासाठी पाखरू होऊन पाखराशी बोलायचे असेच त्यांनी या कवितेतून सांगितले आहे. माणूस कितीही दूर असला तरी तो आपल्याला जवळ असल्यासारखाच भासतो हे आपल्या माणसाचं गाणं यातून त्यांनी व्यक्त केले आहे. 
कोवळ्या कोवळ्या
दवात गवत
चिंब ओल झालं होतं
मऊ मऊ मातीतून 
चांदण रुजून आलं होतं
चांदण ही त्यांची छोटी कविता बरेच काही सांगून जाते.

मन कस धुंद आहे या कवितेतील निसर्ग वर्णन तर अप्रतिमच आहे. 
तुमचं काय गेलं या कवितेत त्यांन प्रेम केलं, किंवा तिने प्रेम केलं, करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं असा रोखठोक सवालच त्यांनी केला आहे. खूप मोठी कविता असली तरी ती परत परत वाचावीशी वाटते. 
शहाणपणाचं गाणं या कवितेत माणसानं शहाण्यासारखं वागावं व जीवनात आनंदाने जगावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे. म्हातारपणाच तरुण गाणं या कवितेत हिरवं पान कधीतरी पिकणार कधीतरी गळून पडणार अस सांगायला देखील ते विसरले नाहीत. गाणं कागदावरच आणि आपल या कवितेत कागदावर छापलेल्या गाण्यापेक्षा ओठावर आलेलं गाणं आपलं असत असेही ते सांगतात. 
सांगा कस जगायचं ही तर सुंदरच कविता आहे. कण्हत कण्हत जगायचे की गाणं म्हणत जगायचे तुमचे तूम्हीच ठरवा अस त्यांनी वाचकावरच सोपवले आहे.प्रेमाची भावना महत्वाची असते ते व्यक्त करण्याचे प्रकार अनेक असतील हे सांगताना ते म्हणतात
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमचं आणि आमचं अगदी सेम  असत
वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा हे निसर्ग वर्णन तर मनाला भावणारे आहे. प्रत्येक जण आपल्या घरात कसा राजा असतो याचे यथार्थ वर्णन गाणं घरच्या राजाच या कवितेत पहावयास मिळते. चिऊताई साठी गाणं या कवितेत प्रत्येकाचं वेगळेपण असत त्याची तुलना करीत बसायचं नसत असा सल्लाही दिलेला दिसून येतो. विदूषकाचे आत्मकथन ही या पुस्तकातील सर्वात मोठी कविता आहे.
एकूणच या पुस्तकातील सर्व कविता वाचताना त्या परत परत वाचाव्यात. पुस्तकच खाली ठेवू नये असे वाटते.
प्रदीप जोशी, विटे
भ्रमणध्वनी.. 9881157709

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू