पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

धन्यवाद, नीरजा! धन्यवाद शिक्षणविवेक!

धन्यवाद, नीरजा! धन्यवाद शिक्षणविवेक!
---------------------------------------
आज किती तरी वर्षांनी स्वर्णपदक 🥇 मिळाले. निमित्त होते, शिक्षण विवेक आयोजित महामराठी प्रश्नमंजुषा......


झालं असं की, मी विद्यार्थीदशेतच स्पर्धेत सहभागी होणं सोडलं. अनेक स्पर्धा जिंकल्या. आता कुठे तरी थांबलं पाहिजे असं वाटलं नि सोडलं. मात्र चार पाच दिवसांपूर्वी सौ. मानसीने एक गुगल फॉर्मची लिंक पाठवली. आणि सोडवायला सांगितले. ती स्पर्धा आहे, याची मला कल्पना नव्हती. शिक्षण विवेक हे माझं एक आवडतं मासिक आहे. त्यांचे उपक्रम देखील छान असतात. डॉ. अर्चना कुडतरकर Madam यांचे नियोजन परिपूर्ण असे असते. कु. मैत्रेयी आणि सौ. मानसी देखील त्यांच्या उपक्रमांत अनेकदा सहभाग घेतात.


तर गुगल फॉर्मच्या लिंकवर मी क्लिक केलं. काही मराठी साहित्य / भाषा या विषयीचे प्रश्न त्यात होते. मी सोडवत गेलो. मला आत्मविश्वास होता की, मी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं सोडवली आहेत. माझा आत्मविश्वास सार्थ ठरला.


त्यानंतर शनिवारी कळाले की, शिक्षण विवेक तर्फे या उपक्रमात यशस्वी ठरलेल्या लोकांचा मेडल, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे.


यशस्वी जनांच्या सूचीमध्ये माझी विद्यार्थिनी आणि आताची सिद्धहस्त संस्कृत शिक्षिका सौ. नीरजा पुरंदरे – बेलसरे यांचेही नाव होते. आपल्याला आणि आपल्या विद्यार्थिनीला एकाच व्यासपीठावर पारितोषिक मिळणार आहे, ही बाब हर्षप्रद होती. मात्र माझ्या पूर्वकार्यनिश्चितीमुळे मला प्रस्तुत कार्यक्रमासाठी उपस्थित राहणे शक्य नव्हते. मग मी नीरजा बेलसरे यांना फोन केला. त्यांचे अभिनंदन केले. आणि त्यांना माझी अडचण सांगितली. अडचण सांगितली की उत्तर मिळतेच असे काही विद्यार्थी सरस्वतीमातेच्या कृपेने मला लाभले आहेत. त्यापैकी एक म्हणजे नीरजा. अडचण दूर झाली. काल नीरजा बेलसरे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून माझे आणि त्यांचे पारितोषिक स्वीकारले. आज माझ्याकडे सोपविले.


|| माऊली की जय जय श्रीकृष्ण ||


धन्यवाद, नीरजा! धन्यवाद शिक्षणविवेक! धन्यवाद डॉ. अर्चना कुडतरकर Madam!
चंद्रहास शास्त्री 
👏👏👏????????????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू