पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सखी तुझी मी आभारी

तुजवरी कविते ग

किती भरावे ग भारी

तूच माझ्या जिवनाची

       खरो खरीची उभारी ॥धृ॥

तुझ्यासवे विसरते

व्यथा जीवनाची सारी

वृथा पोखरण्यासाठी

         मनी अवतरणारी॥१॥

तूच सखी खरोखरी

मला त्यातून सावरी

तुझ्याविण कधी कधी

        बघ होते मी बावरी॥२॥

तूच करिते ग राज्य

इवल्याशा मनावरी

तूच घालिते आवर

        तना मनास सावरी॥३॥

कसे मानावे आभार 

तुझी झाले मी आभारी

चित्र माझ्या मनी नवे

           रेखाटते मनोहारी॥४॥

गेले तुझिया आहारी

मीही पुरतीच सारी

तरी तूच एक मला

    माझ्या जीवनात प्यारी॥५॥

लय माझ्या जीवनाची

तूच गुणगुणनारी

अशी तूच एक सखी

       माझी दुनियेत न्यारी॥६॥

    *--निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.*

*शब्दसृष्टी*, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव. खान्देश, महाराष्ट्र, भारत.

दूरध्वनी क्रमांक:- ९३७१९०२३०३.

:::::::::::○●○:::::::::::○●○:::::::::::○●○:::::::::::::

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू