पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आयुष्यातलं मखमली पर्व

ललित लेखन


   *आयुष्यातलं मखमली पर्व*

????????????????????????????


 *कुठला अंकूर रुजला* 

 *कुठला भाव उमलला* 

 *पण तरीही तुला बघता* 

 *देह जिथल्यातिथे थिजला*


     प्रेमाला उपमा नाही , ते देवाघरचे देणे ....या ओळी उच्चारतांना प्रेमावरील श्रद्धाही सत्य, शिव व सौदंर्याचा शोध घेत घेत शरीर अन् मनाच्या तपशीलाचा अंदाज घेत असाव्यात...तसं बघता तो किंवा ती आवडणं  ही जीवशास्त्रीय घटना ...तारूण्यातील प्रीतीची चाहूल म्हणजे  नेमकं काय ?...त्याच्या रसरेषांच्या पाऊलखुणांवर तिने चालत जाणं की  त्याच्या  व्यक्तीत्वाच्या रंगात तिने रंगून जाणं ....रुजलेल्या प्रेमाच्या अंकुराला गोंजारणं की प्रेमाचं रुपांतर केवळ भक्तीत करणं...प्रेमातली ही अशी अलौकिकता जिथे दोन जीव वेगळे भासत नाही ...देह अन् मनही वेगळे भासत नाही ....तादात्म्य पावणं यालाच तर म्हणत नसावे ?????


     काय असतं प्रेमात पडणं ? हातात हात घेऊन  कुठली स्वप्नशिल्प कोरत जातं मन एकमेकांच्या तळव्यावर ? ....आरक्त गालावरचा रंग इतरत्र  दिसू नये म्हणून स्वतःशीच चाचपडणं किती  गोड होऊ शकतं ...कलंदर तारूण्यातले बाहू अचानक जगण्याला वेढा घालतांना दिसत असतील तर तो ही हृदयोत्सवच असावा...जगण्याचं सुनेपण कुणी तरी भरून काढून   परसातील निशिगंध मनात फुलवत असेल तर मन त्याच्या वाटेकडे डोळे लावून  का बसू नये ? असच व्हावं लालनपालन  नाजूक भावनांचं ...अशीच फुलावी भावभावनांची हिरवीकंच पालवी  त्याच्या सहवासात..????.


       शरीर अन् मन वेगळं कुठे असतं का ?...मग त्याचा हलकासा स्पर्श रमणीय प्रणयप्रदेशात घेऊन जात असेल तर दोन देहातलं अंतर सलेलच....संकोचाचे धुके लज्जेने का होईना पण दूर करावेसे वाटते मनाला....मनातली एक लाट त्याला बिलगुन यावी अन्  देहातल्या ग्रंथीच्या मुलभूत मागण्या पूर्ण व्हाव्या असं वाटणं अगदी साहजिकच ....????


       खरं तर प्रेमातल्या कुठल्याच अपेक्षा अनाठायी नसतात ...मुळात प्रेम हाच एक आदर्श भाव आहे....दोन श्वास एकमेकांना चैतन्य देऊ बघत आहेत तर मग श्वासातल्या भावनांवर नियंत्रण  का ?....नाजूक भावनांनी बांधला गेलेला प्रत्येक  जीव प्रणयभावनांना गोंजारत असतोच  फक्त  कुणाच्या  त्या भावना धुसर असतात तर कुणाच्या मुक्त  इतकाच काय तो फरक...????


       भावनात्मक मन सौदर्यात्मक कधी बनतं नाही  कळत अन् विचारात्मक मन स्वप्नात्मक कधी बनतं हे ही नाही  कळत...पण प्य??%B

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू