पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फांदी

*फांदी......!*


त्या फांदीवर दोघांचे 

लक्ष एकदाच कसे गेले?

त्या फांदीने सांगा नेमके

पुण्य कोणते होते केले?


श्रीराधेच्या अन् श्रीकृष्णाच्या

राजीवलोचनांचा विषय

ती फांदी आम्रतरूची अनुपम

जाहली साक्ष अशी अक्षय


खगांचे रम्य मधुर कूजन 

भ्रमरांचा मधुर गुञ्जारव

राधेच्या कपोली खळी

कृष्णवदनी दिव्य भाव


स्थायी रसनाम लभते

साहित्याचे सुंदर सूत्र

साकार सगुण रूपावले

दिव्य दिव्य मनोहर मैत्र 


पापणी न लवते दोघांची

ही भाषा नव्हे तिघांची

डहाळी होतसे वासंती

लक्ष्मी ही वृन्दकाननाची


त्या फांदीस करी साष्टांग वंदन

करी तिचे हार्दिक अभिनंदन 

भागवतरसिक चन्द्रहास हा

आठवे मनी श्रीराधानंदनंदन


- चन्द्रहास 


जय श्रीराधे जय श्रीकृष्ण!

वसंत पंचमी, शके १९४५ (सन २०२४)


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू