पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लटके बोल

संगीता देवकर यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा प्रयत्न 

________________________


समांतर चाललो आहोत तर, चालू असेच थोडे

काहीच नसण्यापेक्षा दोघात हे अंतर काहीसे पुरे

जखमांचे व्रण आता दाखवणार नाही जगायला हा क्षण पुरे

मनालाही केले बंदिस्त नाही फुटणार त्याला आता स्वप्नांचे धुमारे

________________________


           लटकेच बोल 


सुटले जे पडले होते, मनास माझ्या कोडे

हे अंतर कधी ना मिटणार परि, गाठू या क्षितिज रे

वाट चालतो एका दिशेने, हे समाधान चित्ती ऊरे

अपेक्षांच्या परिघाची सीमा, केली मर्यादित रे


लोचनांची भाषा कळते, शब्दांविण संवाद घडे 

मतभेद जरी, मनभेद नसो, एवढेच मजशी पुरे 

किल्मिषांची जळमटं सारी, झाडून दूर करू रे

नको दूषणे एकमेका, सामंजस्य स्वीकारू रे


जखमांवरती धरेल खपली, जरी व्रण राहतील उघडे 

स्वप्नरंजन निद्रेपुरते, वास्तवात जगू रे तुलाही रूततील ना, माझ्या बंदिस्त मनाचे कंगोरे

लटकेच ते बोल माझे, नको मनावर घेऊ रे


@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

१७-३-२४ 


©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू