पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

फक्त तू आहे

ज्याच्यासाठी धडपडावं ते तोंडाशी आल्यावर 

अवघड वाटू लागावं

ज्याला भेटण्यासाठी तिळतिळ व्हावं 

त्याच्या भेटीतच विरहाचं भयाण कुंपण दिसावं 

स्वप्नाच्या दुनियेत गोड़ स्वप्नांचा प्रवास 

पण वास्तवात आल्यावर राखच राख 

तुझा नकार ,माझं नैराश्य आणि भावनांचा थरकाप 

कधी तू भासतोस मैलोनमैल दूर 

क्षणातच खोल हृदयात

चालले असते थोडे तर गाठलं असतं तुला 

पण संसाराचा विचित्र बेड्या अडकल्या आहे पायात 

ही का अडकले आहे मी? कशात फसले आहे?

कळेनासे झाले आहे या जीवनाच्या विस्तवात 

आणि मला जाणवतंय कि तुझ्या भेटीची आतुरता 

आहे माझ्या एकटीच्याच मनात 

कारण तू फक्त तूच आहे माझ्या श्वासात

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू