पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पिकलेल्या पानाला विचारा...

पिकलेल्या पानाला विचारा ,
अजूनही दुःख हिरवे का ?
गळून पडले माती वरती  ,
तरीही झाडाशी जवळीक का ?...

बदलणाऱ्या ऋतूंचे ,
अंग अंग सोसले ,
पाण्यात भिजले की,
उन्हात हिरमुसले ...

येता पानगळ कधी ,
काळीज किती धडधडले ,
आता नको देवा ,
अजूनही काही बाकी उरले ...

पुन्हा झिरपता हिरवळ,
तन मन चकाकले ,
सांज छेडून गेली ,
रात्रभर चांदणे वेचले...

आज क्षितीजाशीच ,
काय तुझे बिनसले,
अलगद खाली येताना,
डोळे आसवांनी भरले ...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू