पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माहित आहे का? तुला...

माहित आहे का? तुला,
का? तुलाच माहित नाही,
जीव जडला तुझ्यावर ,
का? तु मनावर घेत नाही...

पाहतांना तुला ,
आनंद गगनात मावत नाही,
साजं ढळता ,
रात्रभर डोळ्याला झोप नाही...

मखमली स्वप्नांचे ,
मोह आवरत नाही,
गुंतल्या स्पंदनाचे,
धागे सोडवत नाही...

तुझा भास डोळ्यांना,
विरह सहावत नाही,
कळून ना कळले तुला,
का? हा त्रास जिवघेणा नाही...

तुझ्या असण्याची जादू,
परिकथा ही खोटी नाही,
मी हरलो तु जिंकले ,
तुझ्याशीवाय राहवत नाही ...

माहित आहे का? तुला,
का? तुलाच माहित नाही,
जीव जडला तुझ्यावर ,
का? तु मनावर घेत नाही...

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू