पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

त्याच जुन्या वाटेवर...

त्याच जुन्या वाटेवर ,
पुन्हा एकदा भेटू ,
तु वळून पाहशील मला ,
पतंग आसमानी काटू ...

त्याच जुन्या वाटेवर ,
मन भाळले तुझ्यावर ,
तु सर पावसाळी ,
मजवर गेली बरसून ...

त्याच जुन्या वाटेवर ,
हळव्या नदीच्या काठावर,
चांदणे बुडाले पाण्यात,
गेले अंगअंग सजून...

त्याच जुन्या वाटेवर ,
मन वाहते लाटेवर,
तु घेऊन गेलीस मन,
मी थकलो शोधून ...

त्याच जुन्या वाटेवर ,
नैराश्य सारे झटकून,
स्वप्न भरले डोळ्यात ,
जीवन जगू खूलून ...

त्याच जुन्या वाटेवर ,
हरवून जाऊ ऐकदा ,
सापडू नव्याने पुन्हा,
प्रेमात पडू ऐकदा...


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू