पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

उगाच दुःखी राहण्यात काय अर्थ?

उगाच दुःखी राहण्यात काय अर्थ?
(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
मानवी जीवन ही आपल्याला लाभलेली एक दैवी देणगी आहे. जीवन हे आनंद व दुःख यांचे मिश्रण असते. प्रत्येकाच्या जीवनात त्याचे प्रमाण कमी अधिक असते. माणसाने आनंदाने कधीच हुरळून जायचे नसते. दुःखाने कधीच खचून जायचे नसते. बघा ना परमेश्वराने आपणास धडधाकट शरीर दिले आहे. सौदर्य दिले आहे. सुदृढ मन दिले आहे. चांगले आचार विचार उच्चार दिले आहेत. मग आपण आनंदी राहायला नको का? हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे आज  20 मार्च आंतर राष्ट्रीय आनंदी दिवस. मला लोकांचे मोठे आश्चर्य वाटते. काही माणसे सतत चिंताक्रांत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत आठ्या असतात. ही माणसे कधीही हसत नाहीत. सतत रडवेला चेहरा घेऊन जगत असतात. जस काही साऱ्या जगाचे दुःख यांच्याच शिरावर आहे. मुळात आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण फार कमी असतात. आपण त्याचा देखील आनंद लुटत नाही. कपाळावर आठ्या असलेली माणसे स्वतः आनंदी नसतात. दुसऱ्याला देखील आनंद देऊ शकत नाहीत. माणसाने कसे मनसोक्त हसले पाहिजे. खळखळून हसले पाहिजे. हास्य आपली जगण्याची उमेद वाढवत असते. हास्याचा एक क्षण आपणास दिवसभर फ्रेश ठेवत असतो. आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. कोणाला मोबाईल पाहण्यात आनंद मिळतो. कोणाला गप्पा मारण्यात आनंद मिळतो. कोणाला स्वयंपाक करण्यात आनंद मिळतो. कोणाला फिरण्यात आनंद मिळतो. कोणाला खाण्यापिण्यात आनंद मिळतो. म्हणतात ना " आनंदी आनंदी गडे, इकडे तिकडे चोहीकडे ". आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी हसतमुख सुंदर व्यक्ती पाहिली की मन कसे प्रसन्न होते. हसतमुखाने केलेले स्वागत मनाला किती दिलासा देते. पती कामावरून दमून घरी आला पत्नीने हसत हसत त्याचे स्वागत केले. पती कामावरून घरी आला आणि पडत्या चेहऱ्याने पत्नीने स्वागत केले. या दोन्ही घटना पैकी कोणती घटना तुम्हाला अधिक आवडेल. एक स्मित हास्य समोरच्या माणसाला आपलेसे करते. प्रेमात आकर्षित करून घेते. रस्त्याने जाताना एखाद्या मुलीने स्मित हास्य केले की आपण वेडेपिसे होऊन जातो. माणसे फिरायला त्यासाठीच जात असतात. हसत जगावे हसत मरावे असे उगाच नाही म्हटले जात. आजच्या आनंदी दिवसाच्या निमित्ताने हसत हसत जगायला शिका. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू