पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मागणी

एके दिवशी भल्या पहाटे 

खिडकीतून समोर प्रभु आले 

हाक मारुनी नावाने

झोपेतून मला उठवले 

सांग बाळा तुला काय हवे 

या क्षणी समझ ते तुला मिळाले 

बावरली मी , घाबरली मी 

काय बोलू  ना मला कळाले 

काही क्षण विचार करून मग

ईश्वरासमोर मी बोलते झाले 

तू जे दिले ते नेहमी स्वीकारले 

हसत कष्टांना समोरी गेले

एकच इच्छा उरली आहे 

तीच बोलून मोकळे झाले  

"पुढच्या जन्मी तरी 

त्याची माझी भेट घडू दे"

काही अजून न शिल्लक राहिले 

माझे हे वाक्य ऐकून 

देवाला ही हसू आले 

म्हणाला "अगं वेडे" 

प्रत्यक्ष मी समोर उभा असतांना 

अजून का काही मागता न आले 


मी दृढतेने बोलले त्याला 

"हे एकंच स्वप्न उरलं आहे डोळ्यात"

"याच आशेत संपूर्ण आयुष्य घालवले"

काहीसे गंभीर होऊन आता 

ते मला समजवू लागले 

"या जन्मी जो तुझा झाला नाही

त्याचा भेटीला मन उद्विग्न का झाले?"

एका भेटीच्या आशेत हा जन्म 

तर व्यर्थ गमावला 

काय करशील 

"जर पुढच्या जन्मी 

पण असेच घडाले"? 

अगं तो मनुष्यरूपात पाषाण 

प्रेम त्याला कधी न करता आले 

आता थोडी रागावले मी 

अपमान प्रेमाचे सहन न झाले 

देव..देव..म्हणतात ना तुला सगळे

इतकेसे तुला देता न आले 

का आलास जर इच्छित देऊ शकत नाही 

मी तर तुला नाही बोलावले

हे ऐकता हसला तो मिस्किल 

जा बाई झोप गपचुप तू 

संधिचे सोने तुला करता न आले 

पाठ वळवून भिंतीकडे 

मी स्वता स्वतशी बोलते झाले 

आजचं स्वप्न चांगलं नव्हंत 

एकदा पुन्हा मनाला हे समजावले 



          

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू