पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चिऊताई चिऊताई

चिऊताई चिऊताई


चिऊताई चिऊताई

का गं ही घाई?

वेळ झाली शाळेची 

पोरं शाळेत जाई--


चिऊताई चिऊताई

तुझं घर गं कसं?

अरे मेल्या घर माझं

देवाजीचं देऊळ जसं--


चिऊताई चिऊताई

तुझी पोरं गं कशी?

राम अन लक्ष्मण

घट्ट जोडी रं जशी--


चिऊताई चिऊताई

तुझा नवरा कसा?

जोडीदार माझा

मायाळू प्रेमळ जसा--


चिऊताई चिऊताई

तूझा संसार कसा?

 देवाजीची कृपा

 देई भरून पसा--


चिऊताई चिऊताई

माणूस कसा गं वाटे?

त्याचे अन आपले 

जन्माजन्माचे नाते--



कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू