पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लाईफ स्टाईल की वाईफ स्टाईल

लाईफस्टाईल की वाईफस्टाईल
( प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतो. त्याला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य असले किंवा नसले तरी तो स्वतःच्या मार्जिप्रमाणे जीवन जगत असल्याचे भासवतो. अविवाहित व विवाहित पुरुषाचे जगणे एका अर्थाने वेगवेगळे असू शकते. मला विवाहित पुरुषांची मोठी गम्मत वाटते. हे पुरुष स्वतःच्या लाईफ स्टाईलने जगतात की वाईफ स्टाईलने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर याची सत्यता पटू शकते. स्वतःच्या मर्जी प्रमाणे वागणे म्हणजे स्वतःच्या लाईफ स्टाईलने जगणे. बायकोच्या मार्जिप्रमाणे वागणे म्हणजे वाइफ स्टाईल प्रमाणे जगणे. काही विवाहित पुरुषांना अजिबात स्वातंत्र्य नसते. काय खायचे काय प्यायचे हे बायकोच्या मर्जीवर ठरते. कोणता ड्रेस घालायचा. कोणते मित्र करायचे. काय खरेदी करायचे. कोणाबरोबर बोलायचे. पार्टीला जायचे की नाही. मोबाईलवर काय पाहायचे. या सर्वावर बायकोचा अंकुश असतो. मला वाटले आज कोल्ड कॉफी प्यावी पण बायकोच्या मनात नसेल तर हे स्वप्न कधीच सत्य होत नाही. एखादा ड्रेस नवऱ्याला आवडला असेल पण बायकोला आवडला नसेल तर ती तो ड्रेस उतरवून दुसरा घालायला भाग पाडते. यालाच वाइफ स्टाईलने जगणे म्हणतात. लाईफ स्टाईलमध्ये आपण आपल्या मूड प्रमाणे जगतो. वाइफ स्टाईल मध्ये बायकोचा मूड महत्वाचा असतो. बायका साड्या कधी पुरुषांच्या पसंतीने घेत नाहीत. पुरुष ड्रेस खरेदी करताना बायकांची पसंती महत्वाची असते. लाईफ स्टाईल चांगली की वाइफ स्टाईल चांगली हा खरे तर वादाचा मुद्दा ठरेल. आपल्या स्वतःच्या लाईफ स्टाईलने जगले तर वादाचे प्रसंग उद्भवतात. वाइफ स्टाईलने जगले तर वाद टाळता येतात. जीवन आनंदमय होते. भली भली माणसे वाइफ स्टाईलनेच जगतात. पुरुष वाइफ स्टाईलने जगतात. बायका मात्र लाईफ स्टाईलनेच जगतात. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू