पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्दांचे गाणे गावे ...

शब्दांने हसावे शब्दांने रडावे ,
शब्दंच माझे जीवन ,
शब्दांचे गाणे गावे ...

व्याकुळ मनाच्या ,
विव्हळत्या वेदनेला ,
सुखाचा पाऊस लागता,
पाऊस सुखाचा चाखला ...

भावनेला शब्द यावे ,
कागदावर उतरता ,
शब्दांना पंख फुटावे ...

सांज तिच्या सोबतीला ,
घोर लागला जीवाला ,
व्यक्त करण्या शब्द आले ,
आलिंगन दिले प्रेमाला ...

शब्दांने सुख दुःख घ्यावे,
त्यास कविता म्हणावे,
शब्दांने जीवन हसावे...

गुंतूनी शब्दांत मन,
जाळे शब्दांचे मनाला,
शब्दं शब्दं सोडवावा,
ही आवडती इच्छा मनाला ...

शब्दांने हसावे शब्दांने रडावे ,
शब्दंच माझे जीवन ,
शब्दांचे गाणे गावे ...


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू