पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

बोंबला रे बोंबला जोरात बोंबला

बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला
( प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
होळी म्हटले की आपल्या अंगात एक प्रकारचा जोश निर्माण होतो. कोकणात तर होळी धुलवड मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. होळी म्हटले की बोंब मारणे आलेच. शहरी भागात जरी बोंब मारण्याचे प्रमाण कमी असले तरी ग्रामीण भाग मात्र त्यात अग्रेसर आहे. बोंब मारण्याचा आग्रह कोणाला करावा लागत नाही. आपोआप तोंडावर हात जातो. आपण मराठी माणसे तर बोंब मारण्यात पटाईत आहोत. सध्या तर सर्वत्र बोंब मारण्यासारखी परिस्थिती आहे. कोणतेही क्षेत्र त्याला अपवाद नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. अशा वेळी म्हणावेसे वाटते की बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला. युवकांना नोकऱ्या नाहीत. व्यवसायात प्रचंड स्पर्धा आहे. पुरेसे शिक्षण घेऊन देखील नोकरी पासून अनेकजण वंचित आहेत. अशा वेळी म्हणावेसे वाटते की बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला. मुलींची संख्या घटली आहे. अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलींच्या अपेक्षा मोठ्या आहेत. 35 ते 40 वर्षे पार केली तरी लग्ने होत नाहीत. अशा वेळी म्हणावेसे वाटते बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला. एकत्र कुटुंब पद्धती नामशेष होत चालली आहे. संस्कार करणारे वृद्धाश्रमात आहेत. व्यसनाधिता वाढत चालली आहे. अशा वेळी म्हणावेसे वाटते बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला. सारे राजकारण समाजकारण गढूळ झाले आहे. निष्ठा लोप पावली आहे. अशा वेळी म्हणावेसे वाटते बोंबला रे बोंबला जोरदार बोंबला. होळीच्या दिवशी बोंब का मारतात याच्या खोलात न गेलेले बरे. एक मात्र नक्की की आज बोंब मारण्यासारखी परिस्थिती आहे. होळीची प्रथा हळूहळू कमी होत चालली आहे. मला वाटते प्रातिनिधिक स्वरूपात बोंब मारायला काय हरकत आहे.  ठो ठो ठो ठो. 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू