पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंग जीवनाचे वेगळे

रंगात रंगावे


रंगात रंगावे प्रेमाच्या

नाते मैत्रीचे रुजवुनी मनात! 

सण रंगाचा आला 

विसरुन जावे मतभेद क्षणात! 


म्हणून गेलो रंग उधाळला

जीवनाचा खरा रंग शोधायला!

चेहरे सगळ्यांचेच रंगबिरंगी झाले होते

पत्नी माझी आली नाही ओळखायला!


गेलो शेजार्याच्या घरी 

रंग लावावा शेजारीणीला म्हणून! 

रंग उधळला डोक्यावर खुप मी

दिले तिने गालावर मला ताणुन! 


डोके माझे आले जागेवर 

पाहिले जेव्हा मी डोळे फाडून! 

होती माझी ती सहचारिणी 

म्हणे मला गेले कसे विसरुन! 


जिथे गेलो रंग खेळायला

तिथे समोर येई नाश्त्याची प्लेट! 

रंगाबरोबर आज मात्र 

वाढले होते माझे भारीच वेट!


जिभही माझी रंगात रंगू लागली

भेटले खाण्यासाठी जे त्यावर ताव मारु लागली

पोटाचा तर झाला सारा गडबड घोटाळा

यंत्रणा सारीच शरीराची बिघडली..!


बेरंग जगण्यापेक्षा रंगात रंगुन जावे

हास्य जीवनातले मैफलीत उजळावे!

संवाद साधावा मित्रांसवे कधी कधी

गीत जगण्याचे नवे प्रत्येकाला कळावे!


मोहन सोमलकर नागपूर 

©️®️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू