पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजी अन् जाते

जाताच्या घर घर आवाजात 
लपल्या आजीच्या आठवणी
दळून धान्याला जात्यातं,  
ती स्वयंपाकात भारीच चव आणी ....(१)

काय मज्जा होती त्या दिवसातं
जपले होते तिने प्रेम नात्यातं
प्रेमाने आम्हास खाउघाली दणक्यातं
वाटे तिचे प्रेमच ओसंडतं
तिनेच दळलेल्या मेथकुटातं.......(२)

आजीचे वय सरता सरता 
जणू जातेच रुसले पाहता पाहता
का कुणास ठावूक पण कदांचीतं
धान्याची चव पण दळली गेली
गिरणीच्या नव - नवीन तंत्रज्ञानतं......(३)

आज सुध्दा तितकेच 
महत्वाचे असे आजीचे जातं
फरक इतकाच, की दिसते 
ते लग्नाच्या रुखवतातं
पण रुख्वतास काय माहित
त्या जात्याची किंमतं
माझे पूर्ण बालपण लपलेले असे
त्याच्या घर घर आवाजातं.....(४)


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू