पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मी तुझ्या रंगात रंगुनी...

मी तुझ्या रंगात रंगुनी,
देहभान विसरली,
मन तुझ्याशी एकरूप,
मी, मी न राहिली ...

रंग गुलाबी पिवळा नारंगी,
रंग रंग खेळली,
तु कृष्ण उभा यमुनातिरी ,
मी राधा वेडी झाली...

आसमंत भरला रंगानी,
माती हिरवी निळी झाली,
कण कण रंगता रंगात,
सृष्टीही रंगात नाहली...

होळी रे होळी खेळूनी,
मने आनंदानी भरली,
विसरून सारे भेदाभेद,
सर्व रंग एकरंगी रंगली...


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू