पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीभेचे चोचले नाही पुरवायचे

जीभेचे चोचले नाही पुरायचे

जीभेचे चोचले आता कसे जमायचे
अचकल बचकल खातांनी पोटाकडेही बघायचे
पाणीपुरी,भेलपुरी,बर्गर, पिझ्झा, मंच्युरियन
आता खाणे नाही हो जमायचे.!

जिभेचे असतेच नेहमी तोंडाकडे गाऱ्हाणे 
चटपटीत नाही खायला भेटत म्हणुन ओरडायचे
जिभेच्या तालावर नाही कधीच नाचायचे
कधी बिचार्या पोटाचे तर ऐकायचे.!

लागला आता उन्हाळा उन्हाने जीवाने घाबरायचे
नकोच आता तळलेले ते पदार्थ दुर त्याला सारायचे
राब राब राबुन शरिराचे तापमान समतोल राखायचे
ताक,आंब्याचे पन्हं, ऊसाच्या रसाने दाह शांत ठेवायचे

जिभेचे चोचले जर पुरविले तर
पोटाने कधीना कधी हडताल करायचे..!
म्हणून आता जिभेचे या कानाने ऐकुन 
त्या कानाने हवेत सोडुन द्यायचे...!

मोहन सोमलकर नागपूर 
©️®️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू