पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

जीवन गुलकंद

'जीवन' एक गुलकंद आहे. गुलाबा सारखे सुगंधी. 

 गुलाबाच्या पाकळ्या साखरेचा गोडवा घेऊन सूर्य प्रकाशात मुरलेला "गुलकंद" आरोग्यासाठी गुणकारी.  

जीवन सुध्दा तर असेच आहे. ईश्वर प्रदत्त कलांगुणांनी सुगंधित. प्रेम, वात्सल्य, दया असा गोडवा घेतलेले आणि जीवनातील कठीण परिश्रम, कडू अनुभव, संघर्ष हे आयुष्यातील कडक उन्हे असून त्यांचा ताप सहन करुनच व्यक्तिमत्त्व निखरते. जीवन तेजोमय होते आणि अनुभवातून आयुष्याचा गोडवा चाखायला मिळतो अन् त्याच अनुभूतीने जीवन जगण्याची कला विकसित होते. जुना गुलकंद कसां उत्तरोत्तर गुणकारी होतो, त्याचा मूळचा गुलाबी रंग कालांतराने गडद होतो आणि त्यातील गुणधर्म अधिक मूल्यवान होतात तसेच बालपणापासून घरची वडील माणसे, शिक्षक, हितचिंतक अशां अनेकांची शिकवण, मार्गदर्शनाखाली ह्या 'जीवन गुलकंद' बनण्याची प्रक्रिया सुरू होते. तारुण्य म्हणजे जीवन आनंद जणू फुलपाखरांगत उन्मुक्त विहरण्याचा काळ जसा नवीन गुलकंदाचा गुलाबी रंग . आयुष्याचे विविध अनुभव, परिस्थितींशी संघर्ष, ध्येय निष्ठेचा कणखर प्रवास, कर्तव्य, त्याग, भावनांचा आगळा वेगळा जीवन प्रवास अनुभवांच्या कडक उन्हात तापून "परिपक्वता" ह्यात मुरतो जसा जुना गुलकंद आपला रंग बदलतो. रंग रुपातील परिवर्तन हा प्रकॄतिचा नियम आहे परंतु त्यानेच तर आंतरिक गुणधर्म विकसित होतात आणि आयुष्याला पूर्णत्वाचा विराम मिळतो. 

हाच तर आहे "जीवन गुलकंद". आपल्या गुणांनी, प्रेमळ व्यवहारांनी, आपुलकी च्या दोन गोड शब्दांनी दुसऱ्यांच्या जीवनात ही गुणकारी गोडवा आणण्यासाठी प्रयत्न करा.

मग बरणीतला गुलकंद तुमच्या कडे हसून पाहील अन् सांगेल हो की माझ्या सारखा "जुना पण गुणकारी".

 

सौ. स्वाती दांडेकर, इंदूर

फोन नंबर 9425348807

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू