पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा – सौरभ

 

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा – सौरभ

 

सुप्रसिद्ध निरूपणकार डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांचे "प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा - सौरभ" हे पुस्तक आपल्याला प्राचीन भारतीय ज्ञानाच्या परंपरेचा परिचय करून देते.


आपल्या मनोगतात डाॅ. शास्त्री म्हणतात की, 

प्राचीन भारताची माझी संकल्पना ही ज्ञाननिष्ठ समाजाची आहे. सर्वस्पर्शी असे आणि विपुल असे साहित्य तथा कलाकृती या आपल्याला प्राचीन भारतीय परंपरांची साक्ष देत असतात. असं म्हणतात की, नदी सागराला जाऊन मिळते किंवा नदी सागरापर्यंत पोहोचते, याचे कारण ती आपले उगमस्थान सोडत नाही. तद्वत आपल्याला एक राष्ट्र म्हणून प्रगतीचे शिखर गाठताना आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेची ओळख असायला हवी. तिचा सौरभ म्हणजे सुगंध आपल्याला ज्ञात हवा. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा ही एक व्यापक संज्ञा आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेत तत्त्वज्ञान आहे. तसे महाकाव्य आहे. नाट्य आहे. गद्य आहे. लघुकाव्य

आहे. नीतिसाहित्य आहे. कथानकं आहेत. शिल्प आहे. आयुर्वेद आहे. या अनेकविध विषयांवर माझे लेखन दै. राष्ट्रसंचारच्या रविवारच्या अंकात प्रकाशित होत आहे. यातील निवडक लेखांचा संग्रह असलेला हा प्रथम भाग, ज्याला “प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा – सौरभ” असे अभिधान देण्यात आले आहे.

या पुस्तकातील काही विषयांची अधिक तपशीलवार माहिती पाहूया.

 

वैदिक साहित्य:

चार वेद: पुस्तकात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांची सखोल चर्चा केली जाते. ऋग्वेदात असलेल्या सुंदर सूक्तांपासून ते यजुर्वेदात यज्ञयागांचे विधी आणि सामवेदात संगीताशी संबंधित मंत्रांपर्यंतची धावती माहिती या पुस्तकात आहे. अथर्वेदात विविध उपचारांचा उल्लेख आढळतो.
वेदांग: वेदांचा अर्थ समजण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासा शिक्षा, कल्प, निरुक्त, ज्योतिष, मीमांसा आणि व्याकरण ही वेदांगं कशी उपयुक्त आहेत यावर ही प्रकाश टाकण्यात आला आहे.
 

उपनिषद:

निवडलेल्या उपनिषदांच्या अभ्यासातून अग्नीसारख्या माध्यमांद्वारे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याच्या पद्धतींची कथारूप माहिती आहे.
उपनिषदात वर्णन केलेल्या आत्म्याच्या शोधात्मक प्रश्नांची आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांची चर्चा असू शकते.
मृत्युनंतरच्या जगाबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेल्या नचिकेताची कथा आणि त्याच्या जिज्ञासेपासून मिळालेल्या ज्ञानावर प्रकाश टाकला आहे.
 

संस्कृत साहित्य आणि स्तोत्रे:

भक्तिरस: आदि शंकराचार्य रचित "श्रीललितापञ्चकस्तोत्र" यासारख्या स्तोत्रांच्या विश्लेषणातून भक्तिरसाची अनुभूती कशी घडते यावर चर्चा आहे.
 

जीवनदृष्टी:

जीवनमुक्ती आणि भक्ती: चतुःश्लोकी भागवत आणि एकश्लोकी भागवतामधून मोक्ष प्राप्ती आणि आत्मज्ञान यांचा मार्ग कसा आहे या विषयक माहिती आहे.
श्रीमद्भगवद्गीता: भगवद्गीतेचे संतप्रतिपादित महत्व निवेदित केले आहे.
कृतार्थ जीवन: भारतीय तत्त्वज्ञानानुसार सार्थक जीवन कसे जगायचे ही जीवनदृष्टी प्रतिपादित करण्यात आली आहे.
 

सारांशत: हे पुस्तक आपल्याला प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेची एक झलक दाखवते. याचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. शास्त्रीजींची ही पुस्तकमाला या पुढेही प्रकाशित केली जाणार आहे. पुढील भागात “भारतीय दर्शन” या विषयाला अनुलक्षून पुस्तक असणार आहे.

 

"प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा - सौरभ"

शॉपिजेन प्रकाशन, कर्णावती अहमदाबाद

पृष्ठे – ८३

मूल्य – ₹ १६५/-

 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू