पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रेमाची कबूली





सडा प्राजक्ती धरेवर सांडला होता

चांदण्यांचा रंग खाली ओघळत होता

नेत्र मिटुनी,हात पसरून उभी होते मी

समिर गंधित ह्या तनूने झेलला होता


तोच दूरुन मधुर आला नाद सारंगी 

धावले अन् पावले झालीत नारंगी

शेव भिरभिरला नि कुंतल मोकळे सुटले

पाखरू भिजले मनाचे हे  विविध रंगी


भासले गंधर्व लोकातुन  कुणी आले

कातळावर पाय रोवुन ते उभे झाले

नादमय साम्राज्य पाहुन मी हरखलेले

एकदा भिडता नजर धुंदीत मी न्हाले


पांघरोनी प्रेम ते मग  स्तब्ध होऊनी

लोचने बोलीत होती शब्द होऊनी

तेच पहिले प्रेम आहे हे मनी वसले

हृदय ही हर्षीत झाले एक होऊनी


राधा गर्दे

कोल्हापूर 












पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू