पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्न

गर्द पाचूच्या रानामध्ये झुळूक होऊनी स्वैर फिरावे 

फुलपाखरु मखमली होऊनी फुलाफुलावर  भिरभिरावे ।।

निळे पाखरू होऊन केव्हा मधाळ स्वर्गीय लकेर घ्यावी 

रातराणीसम सुगंध उधळीत अवघी चांदणरात सरावी ।।

अल्लड निर्झर कधी होऊनी कड्याकपारिस बिलगावे 

जीवनसरिता कधी होऊनी शेते कुरणे फुलवीत जावे 

कधी वाटते  वृक्षवेलीपरी फळाफुलांनी बहरून यावे तृषार्त भूमी शांतविण्याला मेघापरी कधी बरसून जावे ।।


कल्पना प्रशांत कुलकर्णी 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू