पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सृष्टी

अलगद,थबकत उतरत होत्या सोन शलाका एकांती 

नाजुक हिरवळ उठली होती संपवून ही विश्रांती


कंच, सुर्वणी रंग  पांघरुन गर्भरेशमी गालीचे

कसे पहुडले आनंदाने आठवीत क्षण  रात्रीचे


शनै:शनै:  सोनेरी किरणे गालीच्यांवर अवतरली

भिजले सारे आसमंत अन् ओली धरणी शिरशिरली


तरु,वेलींची पत्रे सारी सोन्याने न्हाऊन   आली

वाकून बघती हसून म्हणती सुप्रभात आली आली


असे भासते साकेताने हळू पदार्पण केले का

लावण्याचा साज मनोहर त्याला ही सापडला का


योगी कोणी ध्यान मग्न ह्या एकांताच ध्यान करे

जगा वेगळे जग पाहुन तो देवाचा मग ध्यास धरे


राधा गर्दे

कोल्हापूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू