पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ट्रेनकथा

ट्रेन यात्रा*

(मराठीकथा) 

"अगं, मनू," "खिडकी बाहेर हातकाढू नको", कितीदा सांगायचे तुला? आईपुन्हा-पुन्हाटोकत होती पण मनू ला धावत्या ट्रेन मधून वार्याचा स्पर्श हवा-हवासा वाटत होता

अंधार पडूलागलाहोता स्टेशनवरट्रेन थांबली की नाना प्रकारचे आवाज.. धावपळ... चढण्यासाठी धक्का - मुक्कीअसेसर्व काही गोंधळ बघून

मजा यायची.. अचानक डब्यात सुध्दा यात्रेकरू चढ - उतर करायचे नंतर ट्रेन चालू लागली की पुन्हा एकदा खिडकी बाहेर ची पळती झाडे बघण्यात गुंग व्हायची...

आता अंधारपडू लागला होता. कुठे टिमटिमणारे दिवे दिसायचे तर कुठे झोपडी बाहेर विस्तव पेटवून रात्रीच्या जेवणाची तयारीचाललेली दिसली... ट्रेनमधेही जेवणाचे डबे उघडले गेले गप्पा मारत जेवण केले. काहींवेळानंतर लहान मुलांची आरडा-ओरड बंद झालीं. आंत शुकशुकाट तसाच बाहेरही भयाण शांततापूर्ण वातावरण वाटत होतं... आईने, "झोप आता" असे दोनदा सुचवले पण मलायाधावत्या प्रवासाचा भरपूर आनंद लुटायचा होता.. मी खिडकी जवळच बसूनहोते. 

एका स्टेशनवर गाडीथांबली असताना बाजूच्या रुळावर दुसरीट्रेन थांबलेली दिसली... त्यांतल्या एका कंपार्टमेंटमधे अक्खी वराती माणसे, नटुन-थटुन

बसलेल्या बायका-मुलीखूप आनंदाने गाणीवगैरे गात होत्या. सुंदर सजलेली नवरीमुलगीखिडकीजवळ बसली होती. खिडकीच्याबाहेरचे गार वारे घेत प्रसन्न पणे स्वप्निल जगात वावरत होती. तीमला खूप आवडली हातभर लख-लखणार्या सोनेरी बांगड्या गळ्यात हार माळा

दिसायला गोरी गोमटी. मी तिच्याकडे टक लावून बघत राहिले. तितक्यांत गाडी पुढे चालू लागली.

दोन्ही ट्रेन च्या दिशा विपरीत होत्या... अजून गाडीने वेग घेतला नव्हता.. तोच. काळोखातून घोड्याच्या टापांचे आवाज आपलाच जवळ - जवळ. येत असल्याचे ऐकू येऊ लागले.. ट्रेन मधील लोकांनाही

काहीं शंका आली असावी दरोडेखोरांच्या धोक्याची.. पटापट दारं खिडक्या बंद करण्याची घाई करू लागले लोक गुपचुप झोपण्याचे

प्रयत्न करत होते पण मनांतून घाबरलेच होते... 

त्या वेळी दुसर्‍या थांबलेल्या ट्रेन मधून जीवघेण्या किंचाळ्या... आरडा-ओरड... आणि मारकाट दूरपर्यंत ऐकू येत राहिली... 

दुसर्‍या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात छापून आली ती बातमीवाचून अंगावर शहारे आले.. कुख्यात गुन्हेगार.....** डाकूच्याअचानक आक्रमणात 18 लोक जखमी... एका वरातीवर प्राण - घातक हमलाकरून रूपयेदागदागिनेआणिसर्व कीमती सामान लुटून नेले. 

आरोपी जंगलातून आले आणि जंगलांतच परतले. 

बातमी वाचून मला तरी वाटत होते की खूप पैसा जमवणे आणि कधी-कधी 

त्या ची उधळपट्टी 

करणे कितीतरी धोकादायक असते.. ही चित्तथरारक ट्रेन कथासत्तर वर्षे लोटली तरी विसर पडलेला नाही.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू