पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

एक अधुरा प्रवास

एक अधुरा प्रवास

 

सौ.ज्योति अलोणे 

 

“ जा चालता हो माझ्या नजरेसमोरून .अरे पंचवीस वर्षाचा झाला आहेस तू आता बिझनेस मध्ये लक्ष घालायचं सोडून जुगार इतर गोष्टी जास्त लक्ष असतं तुझं. मी नावारूपाला आणलेली कंपनी आज एका क्षणात कर्जबाजारी झाली आता तू नकोस माझ्या डोळ्यासमोर .तुझी आई सोडून गेली, तु ही जा एकटाच जगेन मी.

 घरा बाहेर पडल्याशिवाला शिवाय तुला पैशाची किंमत कळणार नाही .चालता हो अगदी या क्षणी..

कौस्तुभ खाली मान घालून सगळं ऐकत होता. त्याच्या एका चुकीने कंपनी करोड रुपयांनी घाटात आली होती आणि कर्जबाजारी झाली होती. त्याने आपली मैत्रीण राहीला फोन लावला पण फोन स्विच ऑफ होता .राही त्याची खास मैत्रीण प्रेयसी म्हणा हवं तर..

 

 आई विना बापाच्या छत्रछायेखाली वाढलेला कौस्तुभला वडिलांनी  कशाची कमी नव्हती पडू दिली. आई आणि बापाचं दोन्ही प्रेम त्याला दिलं होतं. पण पैशाचं महत्त्व त्याला कळतं नव्हते. मध्यरात्री त्याने पुन्हा राहीला फोन लावला..

 

 “कौत्सुभ मला यापुढे कॉल करू नकोस.. तुझ्यासारख्या कंगालाशी  कोण मैत्री ठेवणार..”

      ‌‌ त्याने तिला परत परत कॉल लावायचा प्रयत्न केला पण त्याचा फोन ब्लॉक केला गेला होता..

‘घराबाहेर पडल्याशिवाय तुला पैशाची किंमत कळणार नाही चल चालता हो!’ आपल्या पप्पांचे शब्द कौस्तुभच्या कानात गरम तेल ओतल्या  सारखे भासत होते..

‘ एवढाही आत्मसन्मान नसावा का आपल्या मनात?’ वडिलांनी घर सोडून जायला लावल्यानंतर सुद्धा आपण अजून इथेच आहोत.आता पैसे  कमावुनच मी या घरात पाय ठेवेन.कौस्तुभ ने एक छोटी बॅग घेतली चार कपडे त्यात घातले खिशात मोबाईल टाकला एटीएम कार्ड होते. ते घेतले आणि तो जिना उतरू लागला..

 हॉलमध्ये राहून त्याने संपूर्ण घरावर नजर फिरवली. पुन्हा या घरात आपण येऊ की नाही काहीच माहित नाही त्याचे डोळे भरून आले.

 

     ‘पप्पा माफ करा मला माझ्यामुळे तुमच्या ईज्जतीला धक्का पोहोचला.’

दार उघडून  तो बाहेर पडला. चालतच तो स्टेशनला आला. मध्यरात्रीची वेळ होती. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची खाली अंथरूण टाकून झोपले होते. दोन चार कुत्रे काही खायला मिळते का या आशेने फिरत होती. एका रिकाम्या बाकड्यावर कौस्तुभ बसला. एक कुत्रा त्याच्या दिशेने येऊन त्याच्याजवळ दोन पायावर बसून त्याच्याकडे बघून लागला. नेहमी विमानाने प्रवास करणाऱ्या कौस्तुभ ला अशा वातावरणाची सवय नव्हती. त्याला तिथे कसचच होतं वाटत होतं पण त्याने निर्धार केला होता ईथुन  निघून दुर जायचं जिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही. तेवढ्यात एक तरुणी त्याच्या बाजूला येऊन बसली                                                   “हाय कुठे निघालास?”.                                  कौस्तुभ ने उत्तर दिले “माहित नाही”.              “अय्या ट्रेनची वाट बघतोय आणि कुठे जायचं माहिती  नाही.”

 

तिने लगट करताच कौस्तुभ बाजूला सरकला 

                                                               “ए मग चल माझ्यासोबत!”                                “कुठे “.                                                        “मी म्हणेल तिकडे. त्या रुळाच्या पलीकडे माझी झोपडी आहे लोकं आनंदाने येतात .

 

    “मी तसला नाही”. 

     “मग कसला आहे?”.                                तिने कौस्तुभ चा हात धरला.

     “ ए सोड माझा हात “. कौस्तुभ ने तिचा हात झटकला  

 

  “  ऐ  ‌चिकण्या कुठे जातोस चल नाहीतर मग मी ओरडेल आणि माझी माणसं येथील धावत मग कोणी तुला सोडवायला येणार नाही.” ‌.           ‌ अशा प्रसंगाला कधी तोंड देण्याची वेळ कौस्तुभ ला आली नव्हती. तेवढ्यात त्याला प्लॅटफॉर्म वर ट्रेन  येण्याची अनाउन्समेंट झाली . त्याने तिच्या  हाताला हिसका दिला आणि तो ट्रेन येण्याच्या दिशेने पळाला. ट्रेनचा वेग हळूहळू कमी होत आला‌ काही विचार न करता कौस्तुभ एका डब्यात चढला त्याने वळून बघितले ती तरुणी त्याच्या कडे बघत खी खी करून हसत होती.. 

 ‘सुटलो एकदाचा!’ म्हणून कौस्तुभने एक  निःश्वास टाकला.तो ज्या डब्यात चढला तो एक जनरल डबा असल्याने डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती.

रात्रीची वेळ असल्यामुळे  सारे प्रवासी निद्राधीन होते.. पाच मिनिटं गाडी थांबली आणि गाडीने हळूहळू  वेग घेतला. अशा प्रवासाची सवय नसल्यामुळे कौस्तुभला जरा गुदमरायला होत होतं तो दरवाजा जवळ पोहोचला.

 असा ट्रेनचा प्रवास त्यांनी कधीच केला नव्हता.

"ए मागे हो, रात्रीची वेळ आहे आणि दरवाजा लावून घे"

 कोणीतरी झोपेतच म्हटले. पण कौस्तुभने तिकडे दुर्लक्ष केले. तो  दाराला धरून  उभा राहिला.. मिट्ट काळोख पसरला होता. झाडे, झुडपे ,डोंगरे अंधारातही पळतांना दिसत होती. गाडीने वेग घेतल्यामुळे अंगावर येणारा गारवारा  कौस्तुभच्या  बेचैन मनाला शांती देत होता. अंगावर येणाऱ्या गार वाऱ्याने दिवसभराचा मनावर असलेला ताण  त्याला थोडा हलका झाल्यासारखा वाटत होता .त्याने एक क्षण डोळे मिटले आणि.. आणि काही कळायच्या आतच त्याचा तोल गेला पण दुसऱ्याच क्षणाला कोणीतरी त्याला गाडीच्या दरवाजाच्या आतल्या भागात ढकलले..

 

कौस्तुभ भानावर आला.

 

"मित्रा अशी चुक कधी करू नकोस! आपल्या जीवनाचे मोल जाण"

त्याच्या बाजूला उभा राहून त्याचा हात घट्ट एक चौदा पंधरा वर्षाचा मुलगा त्याला म्हणत होता.

 "काय करू मी जगून काही उद्देश राहिला नाही माझ्या जीवनात आता"

 " जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टीवरून माणूस निराश होतो आणि मरणाचे विचार त्याच्या मनात येतात पण आनंदाने जगत असताना अचानक मृत्यूने त्याला गाठले तर…"

 

कौस्तुभने त्या मुलाकडे पाहिले. त्या मुलाच्या डोळ्यात वेगळीच चमक त्याला जाणवली.

 

"थँक्यू  मित्रा माझा जीव वाचवल्याबद्दल!"

       " मित्रा मी अंकीत. मागच्या वर्षी मी असाच याच गाडीने माझ्या आई सोबत हरिद्वारला जात होतो. ट्रेनमध्ये प्रवास करायला मला खूप आवडायचं. विशेषता  दाराला धरून  वारं अंगावर घेत प्रवास करण्याची मजा काही औरच असते. मी माझं डोकं बाहेर काढून आजूबाजूला बघत होतो आणि अचानक अचानक काही कळायच्या आतच एका खांबाला माझं डोकं आपटलं ..एक किंचाळी ऊमटली आणि माझं शरीर बाहेर फेकल्या गेलं..

गाडीची चेन ओढल्या गेली.गाडी थांबली.. माझं निचेष्ट शरीर बघून लोक हळहळत होते.

 

"पण मग तू इथे कसा?"कौस्तुभने आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले.

 

 त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,.                "असच तुझ्यासारख्याला धोक्याची सूचना द्यायला.. माझ्यासारखी चूक घडू नये म्हणून."

 

आणि तो मुलगा दुसऱ्या बाजूच्या दाराने  निघून जाऊन अंधारात अदृश्य झाला.. कौस्तुभच्या कपाळावर घामाने धर्मबिंदू जमा झाले होते .

 गाडीचा वेग कमी झाला कुठलंतरी स्टेशन जवळ येत होतं. प्रवाशांची उतरण्याची घाई सुरू झाली. रिकामी सीट बघुन तो तिथे जाऊन बसला.अजूनही तो शॉक मध्येच होता.थोड्यावेळाने त्याचा बसल्याजागी डोळा लागला.

 

    " चल छय्या छय्या छय्या छय्या..                       चल छय्या छय्या छय्या ..                                   सारे इश्क की झांजर छय्या छय्या…

 

कौस्तुभला ट्रेनच्या टपावर  डान्स दिसू लागला . अठरा एकोणीस वर्षाची तरुणाई गाण्याच्या तालावर आपल्याच धुंदीत नाचत होती. त्यातील कृष्णा नावाच्या एका तरुणाने त्याला हात धरून आपल्या सोबत सामील करून घेतले..

 

"मला डान्स येत नाही." कौस्तुभने म्हटले..

 

    "अरे यार नाच ना.. मी दाखवतो तुला डान्स करून.."  त्या मुलाने टेप रेकॉर्ड मधील गाण्याचा आवाज वाढवला..

आणि आपल्याच  मस्तीत डान्स करू लागला.. डान्स करता करता त्याने आपले दोन्ही हात वर केले आणि त्याचा स्पर्श वरच्या इलेक्ट्रिक वायरला होताच. करंट लागून तो टपावरून खाली फेकला गेला.. कौस्तुभने  खाली बघितले तिच्या शरीराचा कोळसा झाला होता.. 

 

कौस्तुभ दे दचकून डोळे उघडले. कृष्णा त्याच्या बाजूला बसला होता.

 

         " तू तू इथे कसा?"कौस्तुच्या डोळ्यात भीतीयुक्त आश्चर्य होते. 

 

      "मी ईथेच असतो…आसपास…घाबरू नकोस…एका क्षुल्लक लक्षात कारणामुळे मी माझं जीवन गमावलं.रेल्वे कोळशावर कशावर चालते एवढेच मला माहित होतं. त्याला इलेक्ट्रिक इंजिन लागूनती इलेक्ट्रिकवर धावत आहे त्या बाबतीत  मी अनभिज्ञ होतो.आणि मस्तीत नाचत असताना माझा घात झाला..

“लक्षात ठेव मित्रा जीवन फार अनमोल आहे खूप काही करण्यासारखं आहे…जीवन अनमोल आहे.."

कौस्तुभने कृष्णाचा हात हातात धरायचा प्रयत्न केला पण त्याच्या हातात काहीच  आलं नाही…

 कुठल्यातरी स्टेशनवर ट्रेन थांबली आणि साधूचा एक जथ्था ट्रेनमध्ये चढला. आता थोडं उजाडू लागलं होतं. ट्रेनमध्ये उतरणारे सुरू झाली होती त्याचे लक्ष एका साधूकडे गेले साधने त्याच्याकडे बघून मंद स्मित केल. आपल्या झोळीतून प्रसादाचा एक लाडू काढला त्याच्या हातात दिला. खरच कौतुकला खूप भूक लागली होती कालपासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं त्यांनी हातात लाडू घेऊन तो खायला सुरुवात केली. साधूचे धन्यवाद मानले. 

साधनेही यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं..

“ बाबाजी सब अच्छा  करेंगे चिंता मत कर.”

        वरच्या बर्थवरचा प्रवासी खाली उतरला कौस्तुभ वर जाऊन बसला लाडू खाता खाता त्याला गुंगी यायला लागली आणि त्याने आपले शरीर बर्थ वर टेकवले.. किती वेळ पर्यंत झोपला होता माहित नाही त्याने डोळे उघडले तेव्हा डब्यात संपूर्ण अंधार होता.. आजूबाजूला कोणीच प्रवासी नव्हते.त्याने  वाकुन पाहीले गाडी स्टेशनच्या दूर यार्डात लागलेली होती. सगळीकडे अंधारात अंधार होता. त्याने आपले खिसे  चाचपले. मोबाईल, क्रेडिट कार्ड काही हाती लागला नाही. त्याच लक्ष  गळ्याकडे गेलं  गळ्यातली चेन गायब होती. हातातलं किमती घड्याळ तेही गायब होतं. बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या, त्याही गायब होत्या . 

 

    ' म्हणजे त्या‌साधुने दिलेल्या प्रसादाचा लाडवात  गुंगीच औषध  तर नव्हतं?'.                                त्या बनावट साधू कडून  आपण फसवल्या गेल्याचं  कौस्तुभच्या लक्षात आलं..

आतापर्यंतचा प्रवासातले  त्याला आलेले अनुभव भयानकच होते.. भुकेने पोटात कावळे ओरडत होते.. तहानही लागली होती.डब्यात त्याला अर्धवट भरलेली पाण्याची बाटली  दिसली. काही विचार न करता त्याने ती  बाटली तोंडाला लावली आणि घटाघटा पाणी प्यायला..

 पाणी पिता पिता त्याचे कान टवकारल्या गेले.दुरन येत  असणाऱ्या ट्रेनचा  आवाज त्याला आला.. इथून जवळच कुठेतरी रेल्वे प्लॅटफॉर्म असावा असा अंदाज त्याने बांधला.त्याने डब्याच्या बाहेर डोकावले बाहेर पौर्णिमेचा लख्ख प्रकाश पडला होता.. डोळ्यावरची झापड पार उडाली होती ..                                               'अशा अनोळखी, सुनसान प्रदेशात आपण कसं पोहोचलो त्याला आश्चर्य वाटत होते… काय करावे, कुठे जावे असा विचार करत असतानाच  फिकट गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता घालून एक तरुणी खिडकीच्या बाहेर उभे राहून त्याला खाली बोलवत होती. मंत्रमुग्ध झाल्यासारखा तो डब्यातून खाली उतरला. ती तरुणी रेल्वे रुळावरून चालत त्याला  तिच्या मागून येण्यासाठी खुणावत होती..

  बराच वेळ चालल्यानंतर त्याला दूरवर अंधुकसा प्रकाश दिसला कुठल्यातरी स्टेशनचे ते दिवे होते.. त्याच्या जीवात जीव आला त्याने पाहिले तर रेल्वे रुळावरची ती तरुणी गायब झाली होती.. तो चालत चालत स्टेशनवर आला.. एखाद्या लहानशा गावाचे स्टेशन असावे ते कारण स्टेशनवर त्याच्याशिवाय कुणीच नव्हतं.

 तो तिथेच बाकड्यावर बसून ट्रेन येण्याची वाट बघू लागला. दूरवर गाडी येण्याचा आवाज येत होता.. थोड्या वेळाने गाडी स्टेशनवर येऊन पोहोचली कौस्तुभ पटकन उठून एका डब्यात शिरला.. डब्यात कोणीच नव्हते. तो आश्चर्यचकित झाला .कौस्तुभ बर्थवर बसला. त्याचं लक्ष गेलं समोरच्या बाकड्यावर खिडकीजवळ कोपऱ्यात काही वेळापूर्वी त्याला भेटलेली ती  गुलाबी ड्रेस घातलेली तरुणी बसली होती. तिला तिथे बघून कौस्तुभच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. त्याने मनाशी विचार केला,. 

 

        ' ही आपल्या आधी इथे पोहोचली कशी ?'

 

स्टेशनवर दोन मिनिटं थांबून गाडीने वेग घेतला..

खिडकी उघडी असल्यामुळे खिडकीतून येणाऱ्या हवेने त्या तरूणीचे केस ऊडुन तोंडावर येत होते आणि आणि ती तरुणी आपल्या हाताने तोंडावरचे केस सारखी मागे करत होती. काही वेळापूर्वी अंधारात त्या तरुणीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण आता डब्यात बसल्यानंतर कौस्तुभला तिचा चेहरा स्पष्ट दिसला. नाही म्हटलं तरी दिसायला शंभर जणीत उठून दिसेल असं तिचं व्यक्तिमत्त्व होतं.

 

     त्याची नजर तिच्याकडे जातात ती तरुणी हसली.

 

 "तु ईथे कशी ?"

 

" आईबाबांच्या रागावर मी पण घरातुन निघून आली होती नंतर कळले आपल्या घरापेक्षा ‌सुरक्षित ठिकाण कुठेच नाही."

  तितक्यात दोन‌ तरूण त्या‌ डब्यात आले.. त्या करणेच्या बाजूला जाऊन बसले आणि त्या तरूणीची छेड काढु लागले.ती प्रतीकार करत होती. कौस्तुत तिला वाचण्यासाठी आपल्या जागेवरून उठायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या कोणीतरी बांधून ठेवल्या सारखं तो जागेवरून हलू शकत नव्हता. ती बचावासाठी  ओरडत होती पण तिच्या मदतीला कुणीच आलं नाही. कौस्तुभने आपले डोळे मिटून घेतले. पूर्ण ताकदीनिशी त्या तरुणीने त्या तरुणांना बाजूला टाकले आणि ती डब्याच्या दाराकडे गेली आणि तिने स्वतःला गाडीतून झोकून दिले.

       कौस्तुभने डोळे उघडले आजुबाजुला कोणीच नव्हत. त्यात लक्ष बाहेर गेलं अंधारात गुलाबी ड्रेस परिधान केली तरुणी त्याला हाताने बाय बाय करत होती. कौस्तुभने आपला हात हलवला. आणि दुसऱ्या क्षणी ती तरुणी गायब झाली.

 पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली आणि गाडीत भरपूर प्रवासी चढले.आता घरून निघाल्याचा त्याला पश्चाताप होत होता.  

 

    ‘आपण आपल्या  घरी परत जावं वडिलांची माफी मागावी. पाय धरून त्यांना सांगावं पप्पा मला माफ करा यापुढे अशी चुक होणार नाही. मीही तुमच्या बरोबरीने बिजनेस मध्ये लक्ष घालीन आणि आपल्या बिझीनेसची प्रगती करेन. आतापर्यंत मला तुम्ही मला सांभाळल आता मी तुमचा आधार होईन.’

 त्याने एकाला विचारले ,  

 

      "कुठे निघाले ही गाडी ?"                      उत्तर आले, " नागपूरला"

त्याच्या मनाला समाधान वाटले.

   ‘म्हणजे आपण घरून निघाल्यापासून दोन-तीन दिवस फक्त ट्रेनच्या प्रवासातच होतो…ट्रेनमध्ये भेटलेले ते प्रवासी कोण होते?आपला अधुरा जीवन प्रवास सांगायला की मला सावध करायला की, जीवन अनमोल आहे हे सांगायला…

 

 समाप्त….  

 

        ज्योति अलोणे

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू