पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

श्रेष्ठदान

श्रेष्ठदान 

 

                             लोणावळावरून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये आठ वर्षाचा गौरव चढला आणि त्याने खिडकीजवळची सीट पटकावली. गौरवला ट्रेनचा प्रवास खूप आवडायचा त्याच्यामुळे दर आठ पंधरा दिवसांनी त्याचे आई-बाबा त्याला लोणावळ्यापर्यंत ट्रेनने घेऊन यायचे. 

       “गौरव बेटा तु आतल्या बाजूला हो खिडकीजवळ बसला तर वारं लागेल.”

 कल्याणीने गौरवच्या हाताला धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. 

  “नाही मी खिडकीजवळ बसणार”

  “ बाळा! ऐक ना आधीच तुझी तब्येत चांगली नाही आणखी ताप भरेल अंगात “.

 

    “मग मला स्वेटर दे ,पण मी इथेच बसणार गौरवने ठामपणे शब्द सांगितले आणि तो प्लॅटफॉर्मवरची गर्दी बघू लागला..

गाडी सुटण्याची वेळ होताच प्रवाशांची गडबड झाली 21- 22 वर्षांची सलवार कमीज घातलेली एक तरुणी सोबतच्या व्यक्तीचा हात धरून गाडीत चढली. तिच्या हातात अंध वापरतात तशी काठी होती व गर्दीतून वाट काढून गौरव बसलेल्या बर्थजवळ आली..

तिच्यासोबत चा मनुष्य गौरवला म्हणाला, ही खिडकीजवळची जागा हीची आहे .    

   “अनुराधा ये इथे बस!”

 गौरव नाखुषिनेच बाजूला सरकला. पण सरकताना म्हणाला,

“ही तर आंधळी आहे हिला कशाला हवी खिडकीजवळची जागा, काय बघणार ही बाहेरचं”

 

“गौरव अरे गप्प बैस ना!” गौरव च्या बाबाने ,राघवने त्याला टोकलं.

      अनुराधा खिडकी जवळ बसली आणि प्लॅटफॉर्म वरचा ऐकू येणारा आवाज ऐकू लागली. ट्रेन सुरू होताच गौरवने टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला.

 पावसाळ्याचे दिवस होते. भूर भूर पाऊस सुरू झाला. प्लॅटफॉर्मवर पावसाने काही भाग निसरडा झाला होता. एक थोडी स्थुल प्लॅटफॉर्मवर धावत होती.बहुतेक तिला हवा असलेला डबा दुर असावा. त्याला धावताना पाहून गौरवला मजा वाटत होती.. “ए जाड्या जरा जोरात धाव नाहीतर ट्रेन सुटून जाईल.. आणि तू राहशील ईथेच प्लॅटफॉर्मवर”

 

“गौरव बेटा असं कोणाला काही म्हणायचं नाही”

 

“ आई अग पण तो जाडा आहे मग त्याला जाडा नाही म्हणणार तर काय आणि तो पण बघ ना कसा येऊन राहिला आहे, सांभाळून सांभाळून पडशील” आणि खरोखरच ती जाडी व्यक्ती प्लॅटफॉर्म वरच्या निसरड्या जागेवर घसरली.

 

      गौरव आणखीन जोराने हसला. “अरे उठ उठ जाड्या पटकन उठ पकड जरा हात मी येऊ का तुला हात द्यायला” आणि गौरव जागेवर उठायला गेला

  “गौरव अरे गप्प बस.. येईल ती व्यक्ती.तुला धपाटे द्यायला.” गौरवच्या आईने त्याला दाटले. पण ती व्यक्ती जागेवरून उठली नाही आणि गौरव त्या व्यक्तीला खिडकीतून हात बाहेर काढत बाय-बाय करत होता.. ट्रेन सुरु झाली.

    “ ए आई बघ ना किती छान पाऊस येतोय मज्जा वाटते बघ भारी मज्जा वाटते बघ तू पण बघ ना हात समोर करून पावसाचे थेंब हातात झेलून”

 

“गौरव तुला कितीदा सांगितलं चालता ट्रेनमध्ये हात बाहेर काढायचा नाही.”

    ‌‌”आई तू पण बघ ना मग किती मज्जा वाटते ते.. “. एव्हांना ट्रेनने वेग घेतला होता.सगळेजण आपापल्या जागेवर बसले होते.. कल्याणीने गौरव चे दोन्ही हात हातात घेतले आणि त्याला आतल्या बाजूने सरकवले.. गौरव गाल फुगवून बसला..

 कल्याणीने अनुराधाकडे पाहीले तिच्या दृष्टीची काहीच हालचाल होत नव्हती. कल्याणीच्या लक्षात आले की ती द्रुष्टीहिन आहे.तिला त्या तिच्याबद्दल कणव‌ वाटली.

  ‌कल्याणीने अनुराधाच्या सोबत असलेल्या गृहस्थास विचारले..

   “ मुलगी आहे तुमची?काय झाले हिच्या डोळ्याला ?”

 

“नाही भाची आहे चार दिवसांसाठी मी घरी नेले होते आता पुन्हा तिला तिच्या शाळेत घेऊन जाणार आहे..

 

“ए दीदी कुठल्या शाळेत आहेस तू?”.

 

   “अंधशाळेत आहे . कांदिवलीला होस्टेलला असते ती. बालवयातच डोळे गमावले तिने डाक्टर म्हणतात कुणाच्या नेत्रदानातुनच हिला‌ द्रुष्टी मिळेल”

 

 “तुम्ही प्रयत्न नाही केला? कल्याणीने विचारले.

 

 “अशा पेशटची लिस्ट असते.अजुनतरी नंबर लागायला बरेच वर्षे लागतील. पण आमची अनुराधा फार गुणी मुलगी आहे हुशार तर आहेच, पण मूर्त्याही सुंदर बनवते ती.”

आतापर्यंत बाहेर बघत असलेला गौरव त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागला आणि त्याने अनुराधाला विचारले

 

“दीदी तुझी शाळा कांदिवलीला आहे? आम्ही तिथे राहतो मी तुझ्या शाळेत तुझ्या भेटीला माझ्या एवढी मुलंही असतील ना तिथे…”

 “नाही फक्त मुलींची शाळा आहे “

 “तरीही मी येईल तुला भेटायला!”.

 “हो ये पण तुझं स्कूल असेल ना रे?”.

 “ मी आता स्कूलमध्ये नाही जात.”

 “ कां?”

  “मला बरं नाही राहत ना म्हणून आई म्हणते की मी घरीच अभ्यास घेत जाईल तुझा..”

“हो कां” अनुराधा ने म्हटले आणि मग त्या दोघांच्या गप्पा रंगल्या..

“ए दीदी तुला काहीच दिसत नाही का गं?”

 “नाही “ “मग तू शिकते कशी?” “ब्रेल लिपी असते आमची तिच्यावर शिकते मी”

“ कशी असते मला बघायला आवडेल.मग तुम्ही घड्याळ कसे बघता ?”. “तेही ब्रेल लिपीत असते हे बघ माझ्या हाताला आहे हे असं काट्यांवरून बोट फिरलं की मला किती वेळ झाला तो समजतो!” अनुराधाचे उत्तर ऐकून गौरवला गंमत वाटत होती. “अरे वा गंमतच आहे .

आणि मग गौरव अनुराधेला प्रश्न विचारू लागला. आणि अनुराधा त्याला उत्तरे देत राहिली. कल्याणी आपल्या लाडक्या मुलाकडे कौतुकाने बघत होते.

व्हीटी स्टेशनला गाडी येऊन पोहोचली आणि गौरवने अनुराधाला तिच्या शाळेत नक्की येण्याच कबूल केलं.

घरी येताना गौरव आपल्या राघवला म्हणाली, “गौरव अनुराधा सोबत किती मिसळला ना हा. सोसायटीतली सगळी मुलं शाळेत जातात आणि आल्यावर खेळण्यात गुंग असतात. गौरव जाऊ शकत नाही ना त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला कोणीतरी असं गप्पा गोष्टी त्याच्याशी गप्पागोष्टी करणारा हवा असतो.”

 

“ तू घेऊन जात जा गौरवला अनुराधाच्या अंधशाळेत मन रमेल त्याच.

 

“पण मला अनुराधा बद्दल वाईट वाटते किती सुंदर आहे ती पण संपूर्ण भविष्य अंधारातच.तिचे मामा म्हणत होते कुणी नेत्रदान केलं तर तिला दृष्टी प्राप्त होऊन होईल म्हणून. देव करो आणि तो दिवस लवकर येऊ फार गोड मुलगी आहे ती अनुराधा,मूर्ती ही सुंदर तयार करते म्हणते..”

 

  “हं “राघव तिचं म्हणणं ऐकून घेत होता.

 

“राघव आपण तिच्या कलेला प्रोत्साहन दिले तर..

गौरव चेही मन रमेल त्यात..”

 

      “तुला माहितीये कल्याणी माझ्या मित्राच्या भावाचा वर्कशॉप आहे सर्व प्रकारच्या मुर्त्या तयार होतात तिथे अनुराधाला केव्हा तरी तिथे घेऊन जावे लागेल.”

      त्यादिवशी कल्याणी गौरावला घेऊन अंधशाळेत आली. त्यांच्यासोबत ब्रेल लिस्ट शिकताना.. अंध असूनही सर्व काम नीटनेटके करताना बघून गौरवला खूप खूप कौतुक वाटत होते तिथे त्या मुलींसोबत गौरवचा दिवस खूप छान गेला. आणि मग रोज दोन-तीन दिवस आड कल्याणी गौरवला त्या अंधशाळेत नेऊ लागली. गौरव चा वाढदिवसही तिथेच त्यांच्यासोबत साजरा केला. 

 

“ए आई आपण अनुराधा दीदीला आपल्या घरी घेऊन जाऊया का

“अरे त्याच्यासाठी परवानगी लागेल.”

आणि गौरव च्या आग्रहाखातर राघव आणि कल्याणी ने परवानगी घेऊन अनुराधाला आपल्या घरी आणले.

         “आई आपण सायंकाळी समुद्रकिनारी फिरायला जाऊ.. खूप मज्जा करू..”

गौरवच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सतत तिच्या मागे पुढे करत तिला सतत आपल्याजवळ बसून ठेवत होता दोघांच्या गोष्टी सुरू राहायच्या गौरव तिला खूप काही गोष्टी सांगायचा तिलाही त्या गोष्टीचा आश्चर्य वाटून ती त्याच्या गोष्टी कान देऊन ऐकायची.

 सायंकाळी सगळेजण समुद्रावर फिरायला गेले.गौरवने अनुराधाच्या हात धरला होता.

समुद्रकिनारी फिरताना गौरवने विचारले, “ए दीदी तू बघितला का समुद्र किती अथांग असतो तो?”

“नाही रे फक्त ऐकलाय मी त्याच्या लाटांचा तो खळखळणारा आवाज अनुभव घेतला आहे”

 

“किती सुंदर दिसतो समुद्र आणि तो बघ तो सूर्य समुद्रात बुडत चालला आहे त्याचा तो पिवळसर प्रकाश सगळीकडे पसरला आहे हळूहळू सूर्य समुद्रात बुडत जाईल आणि काळोख पसरेल. हे दृश्य खूप सुंदर दिसते गं बघतच राहावेसे वाटते. मी माझ्या ड्रॉइंग बुक मध्ये काढलय असे चित्र घरी गेल्यावर तुला दाखवेल” 

 

     अनुराधा हसली म्हणाली, ” पण मला दिसतं कुठे गौरव? गौरव तु मला सांगत रहा मी तुझ्या डोळ्याने सर्व दृश्य बघेल..

“सॉरी दीदी”

गौरव तिचा हात धरून वाळूत येऊन बसला.

 

    “दीदी तुला मूर्ती तयार करता येतात ना मग बनव ना एखादा छानसी मुर्ती”.

              अनुराधा ने मूर्ती तयार केली.

“गौरव कशी झाली मूर्ती?”

“ये वेडाबाई कृष्णाची मूर्ती केली आणि बासरी द्दायची विसरली त्याच्या हातात.”

 

“ओह ! मला दिसत नाही ना!” अनुराधाने ओशाळुन म्हटले.

 

“दीदी वाईट नको वाटून घेऊ एक दिवस तू माझ्या डोळ्यांनी बघशील.

तो थोड्याच वेळात एक लाट आली आणि त्या लाटेमध्ये ती मुर्ती वाहून गेली..

गौरव हे सगळे बघत होता पण अनुराधाला दिसत नसल्यामुळे ती हाताने त्या मुर्तीला स्पर्श करू बघत होती.

ते बघून गौरव चे डोळे पाणावले “दीदी चल आपण इथून जाऊ भेळ खाऊया तिकडे जाऊन..”

 

“गौरव चला निघायला हवं संध्याकाळ झाली”.

 

     “ये आई बस ना इथे अजून थोडा वेळ मस्त वाटते “. “ नको बाळा तुला सहन होणार नाही हा वारा “.

 

“ आई नेहमीच काय तुम्हाला अशी टोक असते असं काय झालं मला कुठे जाऊ देत नाही खेळू देत नाही. “बस काही दिवस बेटा तुझी तब्येत चांगली झाली की मग वाटेल तेवढं खेळ”

गळ्यात आलेला दुःखांचा आवडता गिळत कल्याणी कसं बसं म्हणाली..

 

राघवने गौरव चा हात धरला आणि गौरव मुकाट्याने चालायला लागला. त्या रात्री गौरवला खूप ताप आला. तर झोपेतच बरळत होता.

 

    “ आई दिवाळी कधी आहे मला खूप फटाके फोडायचे दिवाळीला खूप फराळाचं खायचं दिवाळीला म्हणाव लवकर ये”. आणि त्याची बडबड एकूण कल्याणीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या..

 अनुराधाला कळलं तीही तिच्या पाठोपाठ उठली “ताई गौरवला काय झालं त्याची तब्येतकां वारंवार बिघडते ?”. “काय सांगू तुला आपल्या गौरव चे आता काही आयुष्याची काही दिवस बाकी आहे”.

 

          “म्हणजे काय झाले त्याला?”

“त्याला एका असाध्य रोग झाला आहे त्यातून तो कधीच बरा होऊ शकणार नाही.आता फक्त त्याच्या इच्छा पूर्ण करायचा. त्याच्या मनाप्रमाणे वागायचं तेवढेच आपल्या हातात आहे.”. आणि त्या दिवसापासून गौरव अंथरुणाला खिळली. डॉक्टरांनी गौरवला तपासले एक थंड संस्कारा सोडला आणि म्हणाले. “राघव आय एम सॉरी पण आता फक्त काही दिवसच..”

त्यादिवशी गौरवने सोसायटीची मीटिंग घेतली.

      “माझ्या गौरवची दिवाळी साजरी करण्याचे खूप इच्छा आहे पण दिवाळीला अजून एक महिना आहे माझी आपणा सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण या चार दिवसात आपल्या सोसायटीत दिवाळी साजरी करूया फक्त माझ्या गौरव साठी एवढे कराल ना?”

 

सर्वांना गौरव चा आजार माहित झाला होता त्यांनी मूकपणे होकार दिला.

 

“कल्याणी आपल्या घरात गोड गोड बनवायला सुरुवात कर दिवाळीला बनवतात तसे आणि घरी घराची सजावट कर दोन दिवसांनी संपूर्ण सोसायटी दिवाळी साजरी करणार आहे.दोन दिवसांनी गौरव आपल्या बेडवर झोपल्या झोपल्या ते फटाक्याच्या आवाज ऐकत होता ती दिव्यांच्या माळेने सजलेली सोसायटी बघत होता..

 

“आई माझ्या हातात एक फुलझडी देना”…

 

 कल्याणीला तिथून उठून निघून गेली.

“गौरवणने क्षीण आवाजात हाक मारली “बाबा मला एकदा ट्रेनमध्ये बसून दूरच्या प्रवासाला घेऊन चला मला खूप आवडतो ट्रेनचा प्रवास..”

 

“हो नक्की बाळा तुझी तब्येत झाली की आपण खूप दूर जाऊ अगदी अमेरिकेला ट्रेन मधून..”

 

“ए बाबा मला बनवतोस होय अमेरिकेला कधी ट्रेनमधून जाते का जातात का मला हिमालयापर्यंत घेऊन चल..”

 

“पण बाबा मला माहित आहे आता मी या आजारातून बरा होणार नाही…”

 

राघव आणि कल्याणी त्याचं बोलणं मुकपणे ऐकत होते.

 

“पण बाबा माझी एक इच्छा आहे जग बघण्याची इच्छा आहे हे जग बघायला मी गेल्यावर माझं मला नेत्रदान करायचा आहे…”

 

“गौरव प्रशांतपणे पडून राहा आता”. 

            “ नाही बाबा मला बोलू द्या..आता माझ्याजवळ फार कमी वेळ राहिलेला आहे.. माझे डोळे अनुराधा दीदीला ता मग मी सदैव तुमच्याजवळ असेल..”

आणि असं म्हणतच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले तो एक टक अनुराधा कडे बघू लागला.

 

“गौरव! गौरव! राघवने हाक मारली. गौरव चे डोळे हसतमुखाने बघत होते.. “कल्याणीsss म्हणून राघवणे जोरात आवाज दिला..

राघवने डॉक्टरांना फोन केला आणि गौरव ची शेवटची इच्छा सांगितली.

 

अनुराधाच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले अनुराधा ने एक अट घातली की डोळ्याची पट्टी निघाल्यानंतर मी सगळ्यात आधी गौरवला बघेन. कल्याणी ने तिला घरी आणले..अनुराधा डोळे मिटुन गौरव ला आवाज देत सगळ्या खोल्या फिरून आली.

 

    “ गौरव कुठे आहे ग ताई?” 

 

“अनुराधा डोळ्यावरची पट्टी काढ तो बघ तुझ्यासमोरच आहे.”

 

अनुराधाने डोळे उघडले. समोरच्या टेबलवर एका तिचे लक्ष टेबलवरच्या एका दहा वर्षाच्या गोंडस मुलांच्या चंदनाचा हार घातलेल्या फोटोकडे गेलं. त्या फोटोतले डोळे तिला म्हणत होते. 

 

            “जगी श्रेष्ठ दान नेत्रदान”

 

समाप्त…

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू