पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संगोपन प्रेमाचे

 संगोपन प्रेमाचे

       प्लेटफॅार्म वर अतिशय गर्दी होती ट्रेन चे आवाज़ , येणाऱ्या आणि जाणाऱ्या ट्रेनच्या घोषणांचे आवाज़, त्यात  लोकांची धावपळ,  खाण्याच्या वस्तुंची विक्री , बॅग टांगलेले लोक , कुली  ,एकंदरीत नेहमीचे़ स्टेशनचे वातावरण होते . 

रवि आपल्या आई बरोबर एकीकडे बसला होता .आई पासून दूर जाणार म्हणून थोडा हिरमुसला होता .  आईने त्याच्या साठी पूर्ण जीवनघालवले होते , रविच्या मनात आई साठी किती तरी भाव येत होते पण  स्वतः च्या मनावर ताबा ठेऊन होता .

आई तू स्वताची काळजी घे माझी पोस्टिंग झाली कि तू माझ्या बरोबर चलणार हे नक्की .

 हो बेटा  माझी काळजी नको करू ,तुझी काळजी घे . इथे माझ्या सोबत मामा मामी आहे . माझे कॅालेज चे मित्र मैत्रिणी आहे ,मला काही त्रास होणार नाही तू मन लावून ट्रेनिंग पूर्ण कर. यशस्वी हो .

 

 गाडी प्लेटफॅार्म वर आली . रविच़े डोळे भरून आले . ई म्हणजे ईश्वरी ने रविला मिठीत घेतल , रवि बाय करून ट्रेन वर चढ़ला . ट्रेन दिसेनाशी झाली तरी ईश्वरी हात हलवत उभी होती इतक्या वेळ थांबवलेला आसवांचा झरा वाहून निघाला .

स्वताला तिने आवरलं डोळे पुसुन ती घरी जावयास निघली . गाडी चालवताना मात्र पुन्हा एकदा जुन्या आठवणीत गेली .

   उच्च पदासीन देखणा विनय आणि माझा सुखाचा संसार होता .  विनय सारखा जीवनसाथी म्हणजे खूप भाग्यवान समजत होते मी स्वतःला . इतका सभ्य ,शालीन , बायको साठीसमभाव असणारा असा विनय . माझे आई वडिल पण त्याच्या वर मुला सारखं प्रेम करत होते  तसेच विनय पण सर्वांना बरोबर घेऊनचालणारा . आमचा छान सुखाचा संसार होता . आम्ही दोघे एक मेकान वर जिवापाड प्रेम आणि विश्वास करीत होतो . मी पण एम .एससी भौतिक शास्त्र होते लग्ना नंतर मी पी एच डी केलं . विनय नी माझी पूर्ण साथ दिली . मला अभ्यासाला भरपूर मदद देखिल केली . मीसहज़ पणे आपलं शिक्षण पूर्ण करू शकले . विनय चे आई वडिल मधून मधून येऊन आम्हाला साथ देत होते . पी.एच. डी होता होताचमला दिवस गेले . मग परीक्षा होता होता ३ महीने निघून गेले . त्या नंतर मात्र मी घरातच राहण्याचे ठरवले .  रविचा जन्म झाला आणिआम्ही दोघे त्याच्या बाल लीले मधे रंगलो . 

       माझा नोकरी करण्याचा विचार मागे पड़ला . मी सर्वस्वी रविमय झाले होते . कधीतरी विनय म्हणत असे ईश्वरी येवढ्याशिक्षणाचा काही उपयोग कर . पण हा निर्णय सर्वस्वी तुझा असणार . 

     

     नाही विनय सध्या मी तयार नाहीं  पुढ़े बघु . मी स्पष्ट नकार दिला .

 

     बरं बाबा तुझी इच्छा म्हणत विनय हसला. तुला  वाटेल तरच कर . 

 

 

       रवि दोन वर्षाचा झाला मग आम्ही काश्मीर ला फिरायचा कार्यक्रम ठरवला . काशमीर ला आम्ही खूप मज्जा केली .श्रीनगर , जम्मु , डलहौजी सर्व जागा पाहून झाल्या . डल झील वर शिकारा नी हाउस बोट पर्यंत जाउन तिथे राहणे म्हणजे एक वेगळाच अनुभवहोता रवि खेळकर बाळ असल्याने आम्हाला त्याला संभाळणे अगदी सोपे झाले .

   

  परतीचा प्रवास सुरु झाला .  आम्ही ट्रेन मधे प्रथम श्रेणीचे तिकिट काढ़ले होते म्हणजे रविला काही त्रास व्हायला नको .

जेवण करूनच ट्रेन मधे चढलो म्हणजे आता नुसते झोपायचे होते . रविला झोपावून आम्ही जरा गप्पा मारत बसलो .  

   विनय तू किती छान आहेस रे . किती मजा आली ना या ट्रिप मधे . मी ना  खूप खूप  एन्जॅाय केलं . मी विनयचे हात धरून ओठा पाशीआणले . विनय ने हळुवार पणे मला कुशीत घेतले . त्याच्या खान्द्यावर डोकं ठेवून मी डोळे बंद केले . 

अचानक जोरात धक्का लागला , ट्रेन थांबली . ट्रेन ला आग लागण्या बद्दल लोकं ओरड़त होते . आम्ही दोघे घाबरून रवि जवळ गेलो . विनय ने रविला उचलून माझ्या कड़े दिले आणि तो दारा पाशी गेला . लोक दारा वर झोंबत होते . दार उघडत नव्हते . मी पण विनय च्यामागे उभे राहिले . मला आगीच्या ज्वाला खिडकीतून दिसल्या . घाबरून मी रविला चिपकउन घेतले . तेवढ्यात विनय ने दारावरील  लोकांना मागे सरकावून 

दार उघडण्याचे प्रयत्न सुरु केले त्याच वेळी २-३ तरणे मुले

त्याच्या मदतीला आले . सर्वांनी मिळून दार उघण्यासाठी पूर्ण जोर लावला , दार धाडकन उघडले . लोकं दारा कडे धाव घेउ लागले  . विनय माझ्या आणि रवि कडे येण्याचा प्रयत्न करीत होता पण भीड त्याला मागे सरकवत होती . त्याच वेळी आगेच्या लाटा आमच्याडब्या पर्यंत पोहोचल्या लोक जास्त घाबरून दारा कडे धाव घेत होते आता मात्र आग दारा पर्यंत पोहोचली . लोकांचा गोंधळ उडालाहोता . तेवढ्यात विनयचा आवाज आला .

        वृंदा कुठे लक्ष आहे तुझे पुढे ये प्रयत्न कर बाहेर निघायचा मला हात दे . 

      हो करत मी थोडं पुढे सरकले . या सर्वात रवि घाबरून जोरात रडत होता . पण तरीही मी पूर्ण प्रयत्न करून पुढे सरकत होते . आता मात्र लोक सामोर जळतांना दिसत होते विनय कुठेच दिसत नव्हता मी दारा जवळ पोहोचून मागे वळून बघितलं तेवढ्यात मला रविसकट विनय ने उचलून आगेच्या ज्वालेतुन काढून बाहेर ठेवले . विनय पूर्ण पेटला होता मी माझा दुपट्टा काढून त्याच्या वर टाकला पणएका मिंटात तो जळून गेला . मी मदती साठी ओरडत होते पण कुणीही ऐकत नव्हते . माझ्या डोळ्या समोर विनय पूर्ण पेटला आणित्यानी जीव सोडला .  

 

      त्यानंतर जीवन बदलून गेले . माझे सासु सासरे , आई वडिल , भाऊ भावजय , दीर जाउ सर्वांची मला खूप साथ मिळाली . मीकॅालेज मधे प्रोफेसर झाले . कष्टाने कां होईना पण विनय ने दिलेले जीवन पार पडले . आज रवि IAS च्या ट्रेनिंग साठी निघाला आतातो IAS आॅफिसर होउन परत येणार .

     घरी पोहोचून मी विनयच्या फोटो समोर उभी होते . डोळ्यातून अश्रुधारा बरसत होत्या पण विनयच्या फोटोतले भाव मला कौतुककरणारे वाटत होते . जणु  कुशीत घेऊन मला म्हणत होता ईश्वरी तू आपल्या प्रेमाचे खूप छान संगोपन केले तुझ्या सारखी आई दैवतुल्यआहे . 

 

        मनाला धीर होता . माझी तपस्या पूर्ण झाली .

आज़ विनयची कमी पुन्हा एकदा जाणवली 

 

       मी दीर्घ श्वास घेतला डोळे बंद करून  कॅाट वर  आडवी झाले . विनय आणि रविचा विचार करत कधी डोळा लागला कळलेदेखिल नाही ….

 

                        सुनिता डगांवकर 

                               देवास 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू