पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दोन फुल एक हाफ

तर हि गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या छोट्याश्या गावातील विजयची. या विजयला लहानशा गावात राहत असल्या कारणाने विमान,रेल्वे, ऑटो-रिक्षा आणि सम्यक शहरी गोष्टींचे फारच आकर्षण होते. चुकून जर या गावाच्या वरून एखादे विमान गेले तरी गावातील सर्व लहान मुलांना त्याचे अप्रूप असायचे. 

असचं एकदा विजयच्या आई वडिलांचे मुंबईला अचानक काम निघाले आणि विजय अजूनच खुश झाला. कारण पण विशेष होत त्याच्यासाठी, कारण अस कि यावेळेस त्या  ला पालकांसोबत मुंबईला जायचा योग आला होता. मग काय विजय अजूनच जोरात तयारीला लागला. शाळेतील मित्रांना पण सांगून झाल कि आता तीन चार दिवस शाळेला दांडी मारणार. सगळ काही ठरलं आणि काहीच दिवसात सामानाची जमवाजमव करून विजय आणि त्याचे आई वडील आपल्या प्रवासाला निघाले. शेंदुर्णी वरून थेट रेल्वे नसल्याने त्यांनी भुसावळ या जंक्शन असलेल्या ठिकाणावरून गाडी पकडण्याचा निर्णय घेतला आणि शेंदुर्णी ते भुसावळ हा प्रवास महामंडळाच्या एस. टी ने करायचा ठरवला. भुसावळ स्टेशनला पोहोचल्यावर त्यांनी सर्वात प्रथम मुंबईचे दोन फुल एक हाफ तिकीट काढले व गाडी येण्याची वाट बघत फलाटावर बसले. तेवढ्यात एक घोषणा झाली कि आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. चोरांपासून सावध राहा. विजयने कुतूहलाने आपल्या वडिलांना विचारले हे काय बाबा चोर इथे पण येतात का चोरी करायला. त्याच्या या प्रश्नावर ते उत्तरले, “हो मग, इथे तर उलट त्यांची जरा जास्तच कमाई होते.” तेवढ्यात दुसरी घोषणा झाली “ भुसावळ वरून मुंबईला जाणारी रेल्वे हि काहीच मिनिटात फलाट क्रमांक एकवर येईल” सर्व प्रवासी आपापल समान हातात घेऊन तयार होते. विजयच्या वडिलांनी त्याला रेल्वेची पुसटशी माहिती दिली होती. तरीही हे सर्व विजयसाठी नवीनच होत. गाडी फलाटाला लागताच सर्व प्रवासी बोगीत शिरले. ज्याला जिथे बसायला जागा मिळेल तिथे बसत होते. विजय व त्याच्या आई वडिलांना पण जागा मिळाली आणि मुंबईचा प्रवास सुरु झाला.

       “झुकूझुकू झुकुझुकू आगीनगाडी” हे गीत मनात गुणगुणत रेल्वे हळूहळू एक एक स्टेशन मागे टाकत होती.  विजयला तर खिडकी जवळ जागा मिळाल्याचा वेगळाच आनंद होता.  विजय व त्याच्या आई वडिलांना शेजारी शेजारी जागा मिळाली. यांच्या समोर एक जोडप त्यांच्या साधारणत: एक दीड वर्षाच्या बाळाला घेऊन प्रवासाला निघाल होत. त्यांच्या शेजारी एक सिनियर सिटीझन होऊ घातलेले काका बसलेले. खिडकी जवळच्या सीट वर एक तरुण मुलगा आणि त्याच्या समोर एक चाळीशितली बाई. बाकी फळ,खाऊ,भेळ अस विविध काही विक्रेत्यांची वर्दळ होती. एका मागे एक स्टेशन जाऊ लागली. विजय चा प्रथम अनुभव होता रेल्वे प्रवासाचा त्यामुळे त्याला अजूनच मजा येत होती. लांबचा पल्ला असल्याने विजय च्या आई ने घरूनच सोबत दशमी चटणी घेतलेली. विजयही समोर बसलेल्या बाळासोबत खेळण्यात दंग होता. तेवढ्यात पुढचे स्टेशन आले चाळीसगाव. रेल्वेगाडी इथे जरा जास्तच वेळ थांबणार होती. काही प्रवासी नव्याने गाडीच चढत होते. काही आपले बसायला जागा नसल्या कारणाने कुठेतरी आधार शोधात उभे होते. तेवढ्यात एका उभे असलेल्या प्रवासीने विजयच्या वडिलांना विचारले, कुठे उतरणार तुम्ही ? “मुंबई” क्षणाचाहि विलंब न करता विजय बोलला. इथे तर जागा मिळणार नाही हा विचार करून त्या प्रवासीने लगेचच समोर बसलेल्या जोडप्याला विचारले “आणि तुम्ही ?” प्रश्न पत्रिकेत आलेल्या आभासक्रमा व्यतिरिक्तच्या प्रश्नचे उत्तर देण्यासाठी जसा विद्यार्थ्याचा चेहरा होतो अगदी तसाच चेहरा करत ते जोडप्यातील पुरुष बोलला “मुंबई” व स्त्री बोलली “नाशिक”. दोघांची हि  उत्तरे ऐकून त्या बोगीतले सगळे अचंबित झाले. नंतर “हिला काही माहिती नाही रेल्वेच” अस म्हणत ते जोडपे आपली मान फिरवून बसले. या जोडप्याची हि कृती विजयच्या आई-वडिलांना जरा संशयादस्पद वाटली. आणि तेवढ्यात चाळीसगाव स्टेशन वरून जाडी आपली शिट्टी मारत पुढच्या प्रवासाला निघाली.

       जशी जशी गाडी पुठे जात होती तसा तसा विजयला कंटाळा येऊ लागला. आणि त्यातच विजय रेल्वेत विकायला येणाऱ्या पदार्थान साठी हट्ट करू लागला. समोरचे काका काकु त्याला बिस्कीट, खाऊ देऊ करत होते व विजयचे आई बाबा नाही नाही म्हणत होते. आता समोरचे बाळही झोपी गेले होते. तो सारख आपल्या वडिलांना “कधी येईल मुंबई?”, अजून किती वेळ आहे मुंबई यायला?”, “आपण केव्हा पोहोचू ?”,”मुंबई खूपच दूर आहे का?” असे प्रश्न विचारू लागला. साहजिकच एका लहान मुलाप्रमाणे त्यालाही एका जागी बसण्याचा कंटाळा आला. विजयची प्रश्नमाला काही केल्या थांबतच नव्हती. विजयची घालमेल बघून समोरच त्या जोडप्याशेजारी बसलेले काका बोलले,” ये बाळा इकडे, मी तुला एक गोष्ट सांगतो.” गोष्ट हा शब्द एकटाच विषय एकदम खुश झाला. “हो काका, सांगा गोष्ट!!!” अस म्हणत विजयच्या वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला. “पण काका मला नवीन गोष्ट हवी बरका तीच तीच जुनी गोष्ट नको. आई बाबा पण अस म्हणतात आणि झालेलीच गोष्ट परत सांगतात”. अस विजय बोलतच सर्वांमध्ये एकच हशा पिकला. आता काकांची गोष्ट सुरु झाली. “बर का बाळा, गोष्टीच नाव आहे – चोरीची शिक्षा. तेवढ्यात चोरी हा शब्द ऐकताच समोर बाळाला घेऊन बसलेल जोडप जरास काचरल...”चोरी” “हां चोरी...ही एका निष्णात चोराची गोष्ट आहे. बरकां!!!” अस म्हणत ते काका गोष्ट पुढे सांगू लागले. आपल्याला खूपच झोप येतेय असा आव आणून ते समोरील जोडपे आपल्या बाला सोबत झोपी गेले.

       “असच एकदा आपल्या सारख एक दादा त्याच ऑफिसच सामान घेऊन मुंबईला निघाला होता. त्याच्या शेजारी असेच काही काका काकू बसले होते. ते पण आपल्या सारख मुंबई ला निघाले होते. गप्पा गोष्ट करत करत रात्र झाली. आणि सगळ्यांना भूक लागली होती. सगळे वाट बघत होते कि रेल्वेत काही खायचे पदार्थ विकायला येतील का याची. पण रात्र झाल्यामुळे कोणीही येईना झाले. एक तास गेला, दोन तास झाले. मग त्या मुंबई ला निघालेल्या दादा ला खूप भूक लागायला लागली. त्याच्या शेजारी बसलेले ते काका काकू म्हणाले कि बाळा आम्ही घरून डब्बा आणलाय तू आमच्यात खाऊ शकतोस. नको नको म्हणत त्या दादा ने नकारार्थी मन डोलावली. पण खूप भूक लागली असल्या कारणाने तो जास्त वेळ नाही म्हणू शकला नाही. मग त्या काका काकुंकडची भाजी पोळी त्यांनी खाल्ली. पोट भरल्यामुले तो दादा खुश झाला. पण नंतर त्याला खूपच झोप यायला लागली. इतकी कि त्याला काहीच सुचत नव्हते. त्याला केव्हा झोप लागली ते कळलच नाही. सकाळ झाली. मुंबई च्या फलाटाला गाडी उभी राहिली. मुंबई ला गाडी पोहोचताच, गाडीतून उतरणाऱ्यांची आणि चढणाऱ्यांची एकच धूम होती. प्लॅटफॉर्म वर गाडी येण्याची जाण्याची आवाज या सगळ्या मुळे त्या दादाला काल रात्री लागलेली शांत झोप अचानक उडाली. अरे आल मुंबई!!! अस म्हणत तो उठला आणि आपल सामान घेऊन उतरणार तेवढ्यात बघतो तर काय समान गायब....त्याची बॅग जागेवर नव्हती. त्याच सर्व महत्त्त्वाच समान चोरीला गेल होत. तो खूप घाबरला. त्या दादाला काय करावे काहीच सुचत नव्हते. त्याने सरळ रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. 

       पोलीस...पोलीस... ओरडत तो रेल्वे पोलीस चौकीकडे धावतच गेला. गाडलेली सर्व हकीकत त्याने पोलिसांना सांगितली. आणि आता ते पोलीस काका त्या चोरांना शोधात आहे.” संपली गोष्ट. कशी वाटली गोष्ट तुला बाळा ??? ते काका म्हणाले. “संपलीपण...मला पुढची गोशत पण ऐकायची होती काका” विजय बोलला. “पुढची गोष्ट?? कोणती रे बाळा ?” ते काका विचारू लागले. “ पुढची गोष्ट म्हणजे त्या पोलीस काकांनी त्या चोरांना कस पकडल” विजय उद्गारला. तेवढ्यात ते काका म्हणाले “ तुला आवडेल पुढची गोष्ट ऐकायला तर मग तुझी भेट मी थेट त्या दादाशीच करून देतो ना. मग पुढची गोष्ट तो दादाच सांगेल तुला ” अस ते काका म्हणताच “हो...चालेल !!!” अस अगदी उत्साहात विजय बोलला. “हा बघ जो दादा खिडकी जवळ बसला आहे न हा तोच दादा आहे.” अस ते काका म्हणताच विजय व त्याच्या आई वडिलांनी खिडकी कडे मान वळवली. “नमस्कार” तो तरुण मुलगा विजय च्या आई वडिलांना म्हणाला. पण आता मात्र विजय च्या आई वडिलांना पण या गोष्टीत पुढे काय होईल याचे विचार येऊ लागले.

“बाळा तुला ऐकायच आहे ना पुढे काय झाल ते?” “हो तर” आता मात्र विजय चे आई बाबच उत्साहाने म्हणाले. “चला तर मग आता हि गोष्ट तुम्हाला सांगत नाही तर दाखवतोच” त्या तरुण मुलाचा आवाज ऐकुन ते बाळासोबत झोपलेले जोडपे झोपेतून खाडकन जागे झाले. आणि नाराजीच्या स्वरात म्हणाले “ शांत झोपू हि देत नाही लोक, काय केव्हाच गोष्ट,चोरी चाललाय.” “आच्छा तुमची झोपमोड झाली का ? माफ करा.” अस ते काका बोलत असतांनाच पुढे म्हणाले “बरोबर आहे तुम्हाला रेल्वेत झोपायची सवय नसेल ना म्हणून झोपमोड झाली.” अस ते काका बोलताच विजयच्या आई वडिलांना थोड थोड प्रकरण लक्षात येऊ लागल. यावर ते काका पुध्ये म्हणाले “बाळ, तु त्या गोष्टीतल्या दादाला तर भेटलास पण तुला त्या गोष्टीतल्या चोराला पण भेटवतो. पण त्या आधी मला संग तुला कोण वाटतंय ते चोर कोण असेल.???” काकांनी अचानक विचारलेल्या प्रश्नाने विजय गोंधळात पडला. “नाही काका...नाही माहित” विजय बोलला. “काही हरकत नाही बाबा...हे जे काका काकू तुझ्या समोर बसले आहे ना तेच त्या गोशितले चोर आहेत.” “काय... तुम्ही आम्हाला अस चोर कस काय म्हणू शकतात” समोरील जोडपे एकदम बिथरले. “ आहातच मुली तुम्ही चोर” तो तरुण मुलगा बोलला. त्या मुलाचा चेहरा पाहून त्या जोडप्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. “आम्हाला नाही बसायचं इथे” अस म्हणत ते जोडपे उठू आगले. तेवढ्यात ते गोष्ट सांगणारे काका “अरे जातोस कुठे?” म्हणत त्याच्या मागे पळू लागले. आणि मग त्या रेल्वे च्या बोगीत एकच धावाधाव सुरु झाली. तो चोर पुढे आणि ते काका मागे. मग कळले कि ते चोराच्या मागे धावणारे काका हे पोलीस आहेत आणि त्यांच्या समोर खिडकीशी बसलेली स्त्री हि पण पोलीस. त्या महिला पोलिसाने त्या चोराच्या बायकोला धरून ठेवले. आणि या बोगीत फक्त ते गोष्ट सांगणारे काकाच नाही तर अजून पण पोलीस बसले होते. हे सारे वेश बदलून मुंबई पर्यंतचा प्रवास करत होते. मग काय कोणीतरी प्रसंगावधान दाखवून चेन ओढली आणि बघता बघता थोड्याच वेळात रेल्वे थांबली. विजयला आता पर्यंत समजले होते कि रेल्वेस्टेशन वर सारख सारख आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा अशी घोषणा का होत असते. यावरून विजय ला हेही समजले होते कि अनोळखी लोकांकडून काहीहि खायचे पदार्थ घेऊ नये. आत्ता पर्यंत पोलिसांनी त्या चोराला पकडले असते व त्याची विचारपूस करतांना समजते कि त्याच रेल्वेत अजून अशी बरीच लोक वेश बदलून चोरीच्या हेतूने प्रवास केत होती. आता मुंबई थोडीच दूर होती. मुंबई च स्टेशन आल. चोर पकडले गेल्यावर मुंबई पोलीस ठाण्यात त्यांना जमा करण्यात आल. नंतर मुंबई च काम आटपून विजय आणि त्याचे आई बाबा घरी परत आले. विजय ने घडलेली सर्व हकीकत शाळेत गेल्यावर आपल्या मित्रांना सांगितली. या प्रसंगामुळे विजयला आपला रेल्वेचा प्रथमच अनुभव अगदीच लक्षात राहिला.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू