पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझ्या आयुष्यात पत्नीचे स्थान

माझ्या आयुष्यात पत्नीचे स्थान
असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. मी तर म्हणेन माझे संपूर्ण जीवन फुलवण्यात माझ्या जीवनाला आकार देण्यात माझ्या पत्नीचा हात आहे. आमचे तसे पाहिले तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज  पण म्हणता येईल.  आमचे एका अर्थाने गुरु शिष्याचे नाते. माझी पत्नी माझ्या क्लासची पहिली विध्यार्थिनी. आठवी पासून पदवी पर्यंत माझ्या मार्गदर्शनाने वाटचाल केलेली. लग्न झाल्यानंतर तिने मला  क्लास घेत न बसता बी. एड करावयास लावले. नोकरीसाठी खटपट करायला लावली. क्लासच्या उत्पन्नावर संसार करता येणार नाही हे ओळखून तिने मला खासगी क्लास संस्कृतीतून बाहेर काढले. माझ्या जीवनाला स्थिरता आणली. अत्यन्त काटकसरीने संसार केला. कधीही कशाचाही हट्ट केला नाही. दोघांच्या स्वभावात मत भिन्नता असली तरी तिने जुळवून घेतले. अमुक एक गोष्ट हवीच असा कधीही अट्टाहास धरला नाही. मुळात तिला गरीब परिस्थितीची जाणीव होती. आज मी सेवानिवृत्त आहे. एकच मुलगी आहे. तिचेही लग्न झाले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात आम्ही सुखाने वाटचाल करत आहोत. मला लेखनाची आवड आहे. ती श्रोत्याची भूमिका बजावते. लेखनाबद्दल स्पष्ट मत अभिप्राय व्यक्त करते. तिच्या पाठबळावर मी सात पुस्तके प्रकाशित करू शकलो. तब्येतीची काळजी घेणे, प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे, जीवनातील संभाव्य धोक्याची कल्पना देणे यात तर तिचा हातखंडा आहे. मला बडबड करायला आवडते. ती जरा अबोल आहे. मी लगेच संतप्त होतो. ती शांत स्वभावाची आहे. मला फिरायला आवडते. तिला घराकडे लक्ष देण्याची आवड आहे. मला पसारा करायला आवडतो तिला पसारा आवरायला आवडतो. त्यामुळे तर आमच्या जीवनाचे गणित चांगले जुळले आहे. आज समाजात मी जो उभा आहे तो तिच्या सहकार्याने. जीवनात अनेक प्रसंगाला तोंड द्यावे लागले मात्र ती सतत पाठीशी उभी राहिली. तिचे नाव सुरेखा. माझ्या जीवनात ती आल्यापासून माझी प्रगती झाली. त्यामुळे मी तिला प्रगती या नावानेच हाक मारतो. तुमच्या सुखी संसाराचे रहस्य काय असे कोणी मला विचारले तर मी सुरेखा उर्फ प्रगती असंच ठामपणे सांगेन.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू