पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

महिला दिवस

#happywomensday

Happy women's day... तो म्हणाला...

कालनिर्णय कडे बघून, अरे advence मध्ये wish करतोय " म्हणून हसून गेला...

"थँक्यू " म्हणत तिने सुध्दा स्मित हास्य करीत त्याला दुजोरा दिला...

"मग मला काय गिफ्ट देणार उद्या..?" तिने मस्करीने सहजचं आपलं विचारलं...
" बोल काय हवं तुला...?" म्हणून त्याने हसून उत्तर दिलं..

"जसा सोशल मीडिया मला नकोसा वाटतो तसा आपण सोबत घालविलेला प्रत्येक क्षण सेलिब्रेशनचा असतो..." असा सर्रास डायलॉग त्याने मारला..
 
"मी तुझा तू माझी, मग
महिला दिन साजरा करायला एकच दिवस कशासाठी...??"

"मी कुठे म्हणतेय मला हॉटेल मध्ये जेवायला जायचंय, women's day म्हणून विनाकारण शॉपिंग करायची आहे. जीवनात समाधान  शोधलं की तक्रारीचा सूर बदलला जातो.मला ओळखत असेल  तर ,तूच सांग मला काय हवंय...??"

" बापरे... नवऱ्याची परीक्षा...!! चॅलेंज accepted राणी सरकार...!" म्हणतं नवरोबाने मुजरा केला...

तुझी प्रशंसा करायला काही एका विशिष्ट दिवसाची गरज नाही ग...
तू माझ्यासाठी कायमच ग्रेट आहे माझी राणी...
तुझा सहवास माझ्या चेहऱ्यावर वेगळचं समाधान घेऊन येतो...
स्वतः च्या तक्रारीपेक्षा तुला माझ्या मनाची काळजी असते...
ऑफीस मधून आल्यावर माझा सूर बदलला असेल तर तूच समजून घेणारी असतेस...
मी आहे ना.. काळजी करु नकोस... सगळं ठीक होईल म्हणून आधारही तूच देत असतेस...
माझ्या आनंदात तू सहभागी असतेस परंतु माझ्या आयुष्यात कठिण परिस्थितीत सहचारिणी म्हणून खंबीरपणे सोबतीला तू उभी असतेस...
नेहमी आपले आप्तेष्ट म्हणून त्यांना सहन करण्यापेक्षा काळानुरूप बदल करून वेळीच स्वतःचे मत मांडणे आवश्यक असते हे सांगणारी तूच असतेस...
काही गोष्टी बोलायचा नसतात तर करून दाखवायचा असतात, हे सांगणारी तूच असतेस...
स्वतःच्या  स्वप्नांना पंख पसरून आभाळाकडे डोळे भरून पाहत पुढे सरसावणारी तूच असतेस...
कोलम, कठोर, स्थीर, शिस्त प्रिय, समाधानी, वेळेनुसार स्वतः मध्ये बदल घडवून आणणारी तू आहेस...
खरं तर, तुला माझ्याकडुन फार काही नको, फक्त माझा तुझ्यासाठीच असलेला अमूल्य वेळ कायम हवा असतो... हो ना...!"

तिला तिचे उत्तर मिळाले होते... तिचे अश्रू अनावर झाले होते...
तो तिच्या डोळ्यात बघत होता आणि ती...
हळूच लाजून त्याच्या मिठीत शिरली होती...!!

~©नेहा खेडकर ~

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू