पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तिला पाहिले की....

तिला पाहिले की ..... 

~~~~~~~~~~~

 

अता स्वप्न सुध्दा खरे वाटते,

तिला पाहिले की बरे वाटते .... 

नसे उर्वशी की नसे अप्सरा, 

तरी रूप ते साजरे वाटते ....

अता प्रेम हा काय अपराध का ?

जगालाच का चाभरे वाटते ?

नको व्हायला कोणताही दगा,

असे सारखे का बरे वाटते ? 

जरा आड नजरेस जाताच ती, 

किती घाबरे घाबरे वाटते ....

मला सांगते काॅल करते अता, 

छवी पाहिली की बरे वाटते ....

जरी आदराने अहो बोलते,

'दिवाकर' मला ते अरे वाटते....

 

 

दिवाकर चौकेकर, 

गांधीनगर (गुजरात) 

मोबाईल  : 9723717047

????

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू