पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्त्री

करुनी पुरुषांवर मात

आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात 


क्षणाची पत्नी ती

अनंत काळाची माता ती


राजकारणात 'राजकारण' करणारी ती

समाजकारणात 'समाजकारण' करणारी ती


कलेत 'कला' दाखवणारी ती

साहित्यात 'लेखिका,कवयित्री' ती


विज्ञानात 'का? कसं?' सांगणारी ती

तंत्रज्ञानात 'नवनिर्माण' करणारी ती


शिक्षणात 'शिक्षिका' ती

उद्योगात 'उद्योजिका' ती


शेतीत 'शेती' करणारी ती

घरात 'स्वयंपाकात सुगरण' ती


सावित्रीबाई फुले यानी पहिल्यांदा दिली हिला संधी

आता नाही हिची कुठेही मंदी


जातेस पुढे तू आपल्या बुद्धीने

खेटतेस प्रतिकूल परिस्थितीला जिद्दीने 


नाहीस तू अशक्त 

हो पूर्णपणे सशक्त


©®-विश्वेश्वर कबाडे उर्फ शुभसंतती,अणदूर

ता.तुळजापूर

जि.धाराशिव

भ्रमणध्वनी-9326807480


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू