पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आशेवर जग जगते

संगीता देवकर यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा उत्कृष्ट ठरलेला प्रयत्न

______________________


त्याला रोज पहाते मी अस्ताला जाताना

भगव्या नारंगी रंगात न्हाऊन निघताना

आठवांच्या सावल्या दूर दूर पसरत जाताना

उद्या पुन्हा भेटण्याचे वचन तो देतो काळोखात विरताना

_______________________


      आशेवर जग जगते


प्रातःकाळी संध्यासमयी, आकर्षितो तो सकलांना 

भर दुपारी डोईवरती, जीव नकोसा करताना 

सौम्य आभा वा उग्र तेज, जीवनदायी अवघ्यांना 

फिरुनी उगवे, फिरुनी मावळे, अर्घ्य/दूषणे ऐकताना


काय देई संदेश भानू, अस्ताचली नित जाताना

नवी पालवी फुटते वृक्षा, रूक्ष पानगळ  होताना

नवीन वर्ष ये पुन्हा, पुन्हा, ऋतूचक्र फिरताना

तैसे बालरूप दिसे तयाचे, नवपहाटे अवतरतांना


कर्म करता निंदो, वंदो, स्थितप्रज्ञता जगताना 

सुखदुःखाच्या ऊन सावल्या, लांब आखूड होताना

चराचरातील घटक अवघे, न थकती पुनरपि कथताना 

काळ कुणास्तव कुठे थांबतो, आशेवर जग जगताना



@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

९-२-२४


©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत. आपल्याला ही कविता आवडल्यास लाईक करून नावासह शेअर करायला काही हरकत नाही.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू