पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आजची स्त्री

आजची स्त्री

 

आहे आजच्या ह्या स्त्रीला

स्वातंत्र्याचा अट्टाहास

झेंडा फडकत आहे

घेत शिक्षणाचा ध्यास

 

केली पादाक्रांत क्षेत्रे

सावित्रीच्या या लेकींनी

पण सवित्रीचा श्वास?

गळा चेपलाय त्यांनी

 

हवी होती तिला क्रांती

दिली तिने त्यांना साद

पडसाद कमी होत गेले

आला तो चंगळवाद

 

 विसरला गेला त्याग

शालिनता घसरली

बरोबरी ती पुरुषांची

नशा का जवळ केली

 

काय हवंय स्वतःला

आधी समजून घ्यावं

चढाओढ करताना

बाईपण ते जपावं

 

हृदयीचा तो ओलावा

तिची ममता आईची

लिलावास का लावावी

ओली माती स्त्रीपणाची

 

जयश्री देशकुलकर्णी

कोथरूड, पुणे -38

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू