पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कवितेत मी

“ कवितेत  मी .... “
मी स्वताला कवितेत
झोतत असतो ,
स्वतालाच कवितेत
ओतत असतो .

माझे सुख –दुख , माझ्या उणीवा
त्यांचे दुखणे , त्यांच्या भानगडी
विषय असतात माझ्या कवितेत .

गरिबांची गरीबी
आणि अमिरांची अमीरी
राजकारण्यांचे काळे कारभार
सांगत नसतो माझ्या कवितेत .

नद्या , झरे , डोंगर बघता- बघता
मी हरवून बसतो
कुठ तरी स्वताला .....
आणि कधी त्या आनंदी क्षण
माळत असतो माझ्या कवितेत .

मी स्वताच शोधत असतो
झोकत असतो दरवेळा कवितेत...... !
@ रामचन्द्र किल्लेदार , ग्वाल्हेर (म.प्र.)
  मोबा. 9425711508

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू