पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कला-दर्शन प्रवाह

२. नमस्कार मंडळी…


असं म्हणतात की जिभेची मोठ्ठी कैची होण्यापेक्षा शब्दांची इवलीशी सुई आणि पक्का धागा व्हावं…हे वचन आचरणात आणण्याचा प्रयत्न करताना…


मी मात्र प्रत्यक्षातील कैची आणि सुई-धागा दोन्हींचाही मनमुराद वापर केला. त्या काळात मध्यमवर्गीय सामान्य माणसांच्या घरातील मुलींना शिवणकाम येणे हे कौशल्याचे मानल्या जात होते. मीही त्याला अपवाद कशी असणार!


सुरूवातीला स्वतःबरोबर आईच्या, बहिणींच्या कपड्यांवर प्रयोग केले. मग नंबर आला पुढच्या पिढीचा…क्रमाक्रमाने भाचीचे, मुलीचे कपडेही शिवुन झाले…पाठोपाठ तिसऱ्या पिढीतील नातीनेही संधी दिली. उत्तरोत्तर माझं शिवणकौशल्य विकसित होत होतं. ते पाहून आधीची पिढी गंमतीने म्हणत असे…’आम्हाला नाही हं असे छान छान कपडे शिवले.’ गंमतीचा भाग सोडा…


पण हे कपडे शिवतांना मला मनापासून आनंद होई. छोटे कपडे शिवतांना तर 'फॅशन डिझाईनिंग' केल्याचा फिल येई. इतका की मला अखंड कापडातून कपडे शिवता येतील की नाही अशी शंका वाटे. या हौसेपोटी एकदा कटपिसच्या दुकानातून खूप मोठे कपडे घेऊन आले. कांही शिवले पण ते संपेपर्यंत सर्वजणी मोठ्या झाल्या. काहींनी स्वतःच आपले कपडे शिवण्या इतकी किंवा रेडिमेड आणण्याइतकी प्रगती केली आणि काहींनी 'पुरे आतां' असं सांगितलं.( अर्थात तुम्हांला कशाला त्रास अशा सबबीखाली… आऊट डेटेड फॅशन नको असं कसं सांगायचं) मग एवढ्या कपड्यांचं काय करायचं! मोठ्ठं प्रश्नचिन्ह! टाकून देण्याचा सल्ला काही मला मानवत नव्हता…कारण सृजनाचा मग तो कोणताही असो…वेगळाच…नाही का?  


आणि मग मला दिसल्या बाहेरच्या अनेक मुली...ज्यांना कुणीतरी दिलेले, चांगले असले तरी जुनेच कपडे घातलेल्या…


मग ठरवलं आपल्याजवळील या कपड्यांचे फ्रॉक शिवुन त्यांनाही नव्या कोऱ्या कपड्यांचं स्पर्शसुख कां नाही लाभू द्यायचं! विचाराला कृतीची आणि सूनबाईचीही, जोड लाभली  आणि आजपर्यंत पाच-सहाशे तरी फ्रॉक शिवलेले आहेत देण्यासाठी…स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधण्यासाठी…


©®भारती महाजन-रायबागकर 

चेन्नई 

१९-४-२४


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू