पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

प्रणाम वीरा महावीरा



प्रणाम वीरा महावीरा


वर्धमान सन्मती अतिवीरा 

प्रणाम वीरा महावीरा


जन्म कुंडलपुरात 

माता त्रिशला, पिता सिद्धार्थ

दीक्षा घेई तारुण्यात

त्यजुनी मिथ्या संसारा


पंचनाम तुजला असती

नावासम तुझी कीर्ती

निर्भय, शुर तुझी वृत्ती

लांछनी सिंह शोभे खरा


समतेचा तव उद्घोष हो

'जगा आणि जगू द्या' हो

सकल जीवांना अभय लाहो

'अहिंसा परमो धर्म' खरा


अनेकांताची शिकवण 

विश्वशांतीमय जीवन 

स्व-परिग्रह सिमित जाण 

भेदा-भेदा नसो थारा


प्रचार अहिंसेचा केला

मार्ग शांतीचा दाखविला

पावापुरी मोक्षा गेला

दिपावली सण हो साजरा


@©®भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू