पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दळणाचं जातं

जातं


अंग हालते डोलते 
जात्यासंग ते बोलते
मुठीतुन एक एक दाना
धान्याचा जसा सुटते.!

पुर्वी असायचे जातं
घेऊन एक एक वळण 
त्यात स्त्रीया धान्याचे
दळत होत्या दळण! 

एका हाताने फिरवी जातं
एका हाताच्या मुठीने धान्य टाकायची 
दळता दळता आजी 
एक एक ओवी म्हणायची! 

निघे मुखातून तिच्या
श्रीहरीसाठी गोड अभंग! 
जात्यावर दळता दळता 
होत असे ती भजनात दंग!

रुप विठ्ठलाचे डोळ्यात पाहे
मनातील भाव ती गाऊन वाहे 
शुध्द मनातुन निघे शब्द 
जरी ती अशिक्षित राहे...!

वाटे ऐकुन त्या ओव्या
वहीत नोंद करुन ठेवाव्या !
संपला तो जात्याचा काळ 
आता कुठून ओव्या ऐकाव्या!

मोहन सोमलकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू