पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्लतःसाठी जगून बघ

सर्व स्त्रीयांसाठी समर्पित 

जगून पहा स्वतःसाठी 
किती धावपळ करशिल! 
एक दिवस सवड काढ 
अशीच का आयुष्य काढशील! 

कपडे वाशींगमशीन मध्ये टाकून 
भाजीची तु फोडणी घालशील! 
कानात इअर फोन घालून 
पोळ्या तव्यावर शिजवशिल! 

स्वतःसाठी जगून पहा
किती धावपळ करशिल!
नाही आली कामवाली बाई 
तर पदर कमरेला खोसून भांडे घासशील!

एक दिवस स्वतःसाठी काढ
नको करु दुसर्‍याचे लाड!
जीव तुझा मेतकुटीस येतो कधी
धावत असते हरिणीसारखी धाड धाड!

एक दिवस स्वतःसाठी काढ
किती धावपळ करशिल! 
आयुष्य असेच मागे पडेल
स्त्री आहे म्हणून किती कष्ट उपसत बसशिल!

मोहन सोमलकर नागपूर ????????‍♂️
©️®️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू