पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्व-अस्तित्व

संगीता देवकर यांच्या पुढील चार काव्यपंक्तींना माझ्या शब्दात पुढे नेण्याचा प्रयत्न

________________________


तुझीच चर्चा तुझेच बोल, मैफिल अशी सजणारी

कविता कशी फुलेल माझी, शब्दांवर तुझीच मक्तेदारी 

जीव जडतो एकदाच, प्रीत फुलते मनी बावरी

जगायला दिलेस‌ते क्षण, कशी फेडु मी तुझी उधारी

_______________________


           स्व-अस्तित्व

 

मैफिलीवर तुझेच राज्य, शब्द सदा तुझ्या सांगाती

देशील का तू उधार जराशी, तव शब्दांची संपत्ती

किती करावे आर्जव, परंतु शब्दच रुसून बसती

सांग ना मम कवितेला, मग कशी मिळावी गती


जीवनभर मी पुरवित राहीन, उधार क्षणांची शिदोरी 

करार परतफेडीचा? करणार नाही मुळी स्वाक्षरी

बावरलेल्या मनोभूमीवर, उमलली चित्कळी फुलणारी

भिन्न तनु परी अभिन्न मन, हेच वास्तव  जन्मांतरी


कशास्तव हवा भाव मनी हा, श्रेष्ठ- कनिष्ठाचा

तुला तरी भावेल का पथ, तुला अनुसरण्याचा

परस्परांसवे मार्गक्रमण, मान जपु स्व-अस्तित्वाचा

मी मीच असु दे, तुही तूच, हा मंत्र जगण्याचा


@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई 

७-४-२४


©®ह्या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत आपल्याला कविता आवडल्यास नक्की लाईक करा आणि नावासह शेअर करा.

________________________

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू