पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सुख म्हणजे नक्की काय असत

सुख म्हणजे नक्की काय असतं!
(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
माणूस जीवन जगत असताना नेहमी सुखाची अपेक्षा करतो. मर मर मरतोय पण सुख काय लागत नाही असे हताश बोलणे देखील आपण कधी कधी ऐकतो. माणसाची सुखाची नेमकी कल्पना तरी काय असते. असा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी खरच सुखाची व्याख्या करणे अवघड आहे याची प्रचिती मला येते. आनंदाने कसे जगावे हे ज्यावेळी माणसाला कळते त्यावेळी तो सुखाची व्याप्ती अजमावण्याचा प्रयत्न करत नाही
एका ठिकाणी  शिबिरात आनंदाने कस जगाव या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. सुख म्हणजे काय? असा साधा प्रश्न विचारण्यात आला. सहाजिकच मजेशीर उत्तरे मिळाली. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. संयोजकानी सर्व कल्पना एकत्र केल्या त्यावेळी कोणीतरी एका कारणाने दुःखी असल्याचे दिसून आले. माणूस 99 टक्के सुखी असला तरी एक टक्का तो दुःखी असतो. गंमत म्हणजे 99 टक्के सुखाकडे तो दूर्लक्ष करतो. एक टक्का दुःख मात्र उगाळत बसतो. खरं तर आपण खूप सुखात असतो मात्र आपणास ते समजत नाही. हीच तर खरी सुखाची गम्मत आहे. लहान असताना वाटते की आपण स्वावलंबी कधी होणार. मोठे कधी होणार. मोठे झालो की जबाबदारीचे ओझे वाढते. आयुष्यात ताण तणाव वाढतात. लहानपणी मोठे होण्याची घाई असते. मोठेपणी लहानपण चांगले वाटते. तरुण असताना वृद्धापकाळ चांगला वाटतो. वृद्धापकाळात तरुणपण हवे हवेसे वाटते.
सुखाच्या कल्पना आपल्या जीवनाला उभारी देतात. इतरांना चालता येत नाही हे बघून आपण चालू शकतो यात आपणास सुख वाटते. दात नसल्याने ज्यांना खाता येत नाही हे पाहिले की आपले दात भक्कम असून आपणास खाता येते यात काहींना सुख वाटते. ज्यांना लघवीचा त्रास आहे तो पाहिला की आपणास लघवी नियमित होते यात सुख वाटते. गोड खाण्यास डॉक्टरांनी ज्यांना मनाई केली आहे त्यांच्याकडे पाहिले की गोड खाण्यासाठी कोणी बंधन घालू शकत नाही त्यांना सुख वाटते. हातपाय धड धाकट आहेत. दोन घास पोटात जातात. हे सुख नव्हे काय? एका लग्नाची गोष्ट मधील गाणे आठवते ना. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?
माणसाने सगळ्या तक्रारीवर मात करायला शिकले पाहिजे. बघा ना मी वयाच्या  67 व्या वर्षी हिमाचल प्रदेशात जाऊन बर्फत जाऊन त्याचा आनंद घेऊन आलो. माणूस बोलण्यातून तोंड सुख घेतो. पाहण्यातून नेत्रसूख घेतो. जीवनात नेहमी आपल्यापेक्षा कमकुवत लोकांकडे पाहिले की आपण खूप सुखात आहोत असे वाटते. आनंदी जीवन जगण्यातच खरे सुख असते. म्हणून सतत आनंदी रहा.

























पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू