पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

राम आहे..

तो नं धर्म ,नं कर्म आहे, नं ईश्वर, ना ही नाव आहे,
मानवी मनाची सर्वोच्च आदर्श अवस्थाच राम आहे.

ज्याला क्रोध जिंकून आचरणात धैर्य धारण करता आले,
निश्चितच त्याला पूर्ण स्वरूपात श्रीराम मिळाले

जर मनात छल-कपट आणि लक्ष्य -स्वार्थाची पूर्ती आहे,
मंदिरात बसलेले राम,राम नाही केवळ एक मूर्ति आहे.

कठीण काळात जर मनांवर नियंत्रण साधता आले
तर निश्चितच आमच्या मन मंदिरात राम स्थापन झाले

ज्यांचे मन स्नेह,दया,सहिष्णुतेचे धाम आहे,
त्यांच्या मनाच्या दाही दिशांना राम आहे,
फक्त राम आहे.

अनुवाद: अंजली राम मोघे
(मूळ कविता:ऋचा दिपक कर्पे)

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू