पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पत्र

प्रिय पतीस....

        i love u.. ""  मागील काही दिवसापासून खूप  त्रास झाला. त्यासाठी क्षमस्व,""

पण काय करू  ?  यात माझी देखील चूक नाहीये. खूप जास्त प्रेम करते मी म्हणून सहन च होते नाहीये. जे झाले त्यात तुमचाही पूर्ण दोष नाही. आकर्षण ही नैसर्गिक देणगी आहे. त्यातून प्रत्येकाला नाही सावरता येत. प्रेम तुम्हीपण माझ्यावर खूप सारे करता यात तील मात्र शन्का नाही. आता मात्र माझ्या मनात भीती दाटली आहे. तुमचा भूतकाळ अन त्यातली पत्रे परत तुमच्या आयुष्यात आली तर माझे काय  ?

    खरे जगणे तर माझे तेव्हा चालू झाले जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही आलात. तेही अनवधानाने.. !""आधी फक्त जिवंत होते. जगणे तुमच्या सोबत शिकले. खूप काही शिकले मी या तीन महिन्यात. सर्वात आधी तर जगायला शिकले आवडत्या व्यक्तीसाठी """

एका ताटात जेवण, घास भरवने, उष्ट्या ग्लासात पाणी प्यायला शिकले. तुम्हांला कदाचित विश्वास होणार नाही कि हे सर्व मी पहिल्यांदा केले..... सार काही नवीन होत माझ्यासाठी खूप कमी वेळात अन जास्त गुंतले मी तुमच्यात    ""! कदाचित लहानपासून कोणाचे प्रेम मिळाले नाही. आणि तरुणपणी कोणाकडून अपेक्षा केली नाही.

तुम्हांला आपली भेट आठवते का  ??  तेव्हा कधीच वाटले नव्हते कि आपण एकमेकांवर एवढे प्रेम करू , किंवा आपल्यामध्ये प्रेम वैगरे  असे काही होईल, सार काही किती अचानक आणि वेगाने घडत गेलं. कधी प्रेम झाले कधी तुमच्यात गुंतत गेले कधी कळलंच नाही. वाटत होत, जाणू काही स्वप्नच आहे हे.. !या स्वप्नासाठी संपूर्ण आयुष्य झोपायला तयार आहे. फक्त ते सोनेरी गोड  स्वप्न तुटायला नको.

हो नाही. करता करता तो दिवस उजाडला अखेर..

  "  साखरपुडा "

        या दिवशी माझी स्वप्ने सत्यात उतरण्याच्या तयारीत होती. अन मी या दिवसाची अतिशय आघाशीपणे  वाट पाहत होते. त्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्हांला पहिले ना असे वाटतं होते. येऊन तुम्हांला घट्ट मीठी मारावी. अन मी एक पाऊल पुढे आलेही होते. तुम्ही एकटं नव्हते. स्वतः ला सावरून घरात पालाळे.. दुपारी तुमच्या सोबत जेवताना सर्वनसमोर खूप लाज वाटतं होती. पण तुमची इच्छा मोडता नाही आली. गार्डनमध्ये  तुमच्या हातात हात घेऊन फिरताना खूप छान वाटलं.. सगळी लोक आपल्याकडे बघत होती. रात्री सर्व पाहुणे गेली. मात्र तुम्ही मुक्कामी होते. अगदी माझ्या मना सारखं झालं. रात्री गप्पा मारता येतील.. सोबत बसता येईल. पण नाईलाज..

माझ्या आईनं  नाही येऊ दिले. त्यानंतर सार काही छान चाललं होत.तुम्ही बर्थडे ला आलात.. मला खूप आंनद झाला. सर्व कार्यक्रम आवरलं.. तुम्ही जाऊ नये अशी खूप इच्छा होती. पण कस थांबून घेऊ तेही कळतं नव्हते... तुम्हाला सोडायला आले तेव्हा मुद्दाम उशीर केला. फिरण्यात पण बहुतेक निसर्गाला ही आपला दुरावा सहन झाला नसावा. अन अचानक पाऊस आला. त्या पावसातले किसिंग.. मी कधीही विसरणार नाही. देवाने दिलेला एक चान्स.. आपण जवळ येण्यासाठी.. मग आपण पुन्हा घरी आलो तेव्हा.. 10.30 झालेत.. मम्मी तर खूप चिडली.. माझ्यावर.. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला राहायला भाग पडले.. तेव्हाही एकाच छताखाली... आपल्यामध्ये दुरावा होता. रात्री सर्वजण झोपले कदाचित तुम्हीपण.. मी मात्र तळमळत होते. तुमच्या जवळ येण्यासाठी.. तेव्हाही माझी मर्यादा आडवी आली... मध्यरात्री.. सर्व  गाढ झोपले होते... सकाळी जेव्हा 04.00  चा अलार्म वाजला. तुम्हांला  जाग आलेली  जाणवले. तुम्ही अलार्म बंद केले. मी रात्रभर झोपले नाही. झोपच येत नव्हती. तुमच्या कुशीत येण्यासाठी तगमग चालू होती, माझी.. तेव्हा तुमच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला जाणवलं. खूप बर वाटलं मला.. आणि क्षणात तुम्ही मला ओढून घेतली जवळ. आणि माझ्या ओठावर तुमचे ओठावर ठेवताच.. मी रोमाचीत झाले..तो किस्स मी कधीच विसरू शकत नाही... तो अलार्म नेहमीच चालू ठेवते मी. तो गजर.ऐकताच माझे हात तुम्हाला चाचपडत राहत.. अंधारात  सारे काही खूप छान अन मस्त चालत होते.. तुम्हाला भेटण्याची आतुरता.. काही केल्या कमी होत नव्हती. मी नेहमी अधीर असे. मम्मी भेटायला येऊ देत नाही म्हणून मी अक्षरशः तिला खोटं बोलून.. ऑफिस च नाव करून भेटायला यायचे. संपूर्ण दिवस जरी सोबत असलो तरी..घरी जावस वाटत नसे. आता तुमचा सहवास हवाहवासा वाटतं होता. वाटायचं दिवस संपू नये. रात्री थांबायला परवानगी नव्हती. त्या दिवशी आपण गार्डन मध्ये बसलो होतो. खूप मस्त मूड होता माझा. तुम्हाला कॉल आला मी बघितल  होते पिल्लू  नावाने सेव्ह होता  तो मी सुद्धा  मस्करीत बोलले तुमच्या gf  चा  कॉल आहे.. अन ते खरं होते. जेव्हा मला समजलं.. एकाएकी डोळ्यात पाणी आले. वाटलं सर्व संपल माझी स्वप्न..ही तुटली.. खूप अपराधी वाटत होत. मी अडसर  तर नाही.. तुम्हा दोघाच्या आयुष्यात प्रयत्न केला स्वतःला सावरायचा पण नव्हतं शक्य.

सगळं शांत झालं होत त्या एका कॉलनंतर .. घरी आल्यावर ठरवलं सविस्तर बोलाव. तुम्ही तयारी दाखवली नाही. तरीही बोलून दाखवले तुम्हांला "पहिल्या प्रेमासाठी परत मागे फिरू शकता.. तुम्ही  नाही  म्हणालात.

तस बघितलं तर तो तुमचा पास्ट होता. हे मान्य आहे. कदाचित त्यांच्या आधी मी आले असते. किंवा दुसरी कोणी.. किमान लग्न झाले असते. तर हे. घडलं नासत.

हे.. तुम्ही मोठया मनापासून सांगितलं हे पुरेसं होत. सर्व विसरून नवीन सुरवात करणार.. होतात. मलाही नाही म्हणणे श्यक्य नव्हते.

तरीही ते सर्व... पास्ट सारखं अवती भोवती  फिरायचे माझ्या.. खूप अस्वस्थ होत असे.

ज्या हातानी तुम्ही घास भरवला.. तो आधीच उष्टा झालाय, ज्या कुशीत शीरण्यासाठी मी व्याकुळ होते. त्या कुशीत आधी  दुसरी कोणी होती...  ज्या बेडवर आपण जवळ आलो. तिथेही... खूप त्रासदायक अनुभव होता  तो. मी नाही सहन करू शकत. एवढं जवळ येऊन मी.. दूर नाही जाऊ शकत. तुम्ही मला शास्वती दिली हे जरी खरे असले तरी??? तुमचा भूतकाळ जर समोर आला तर..? काय? कुणी तुमच्यावर हक्क दाखवू लागले तर मी काय करू..? माझे काय.. होईल? तुमच्या पासून वेगळे होऊन मी तर जगूच शकणार नाही ""! म्हणून तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. आधीचे आयुष्य निवडले तर त्यात मी नसणार. अन ""माझ्या सोबत राहायचे असेल तर तुमचा भूतकाळ व त्यातली  पात्रे पुसून टाकावी लागतील.

मी खूप खूप खूप जास्त प्रेम करते. शब्दात नाही सांगू शकत.

मरेपर्यंत असेच प्रेम करील. सांगाल तसें वागेन. जसे ठेवाल तसें राहिल.


तुमच्या म्हणण्या प्रमाणे तुम्हांला एक संधी द्यायला हवी . स्वतःला बदलण्यासाठी..""! पण का देऊ मी..? माझ्या जागी तुम्ही असता तर दिली असती का  मला एक संधी..?

   कदाचित नाही """"!

असो.. संधी दिली मी पण स्वतःला... !पुढील पाच महिने आपण व्यवस्थित राहिलो तरचं आपण आयुष्यात एकत्र राहू शकतो....

                  


                     तुमचीच..



©


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू