पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी जिजी

                             *माझी जिजी*

 

*भाग एक*

 

छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची जिथे भेट झाली ते गाव म्हणजे चाफळ .ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे असलेले मंदिर हे खूपच प्रसिद्ध आहे . प्रभू रामचंद्रांचे मंदिर तसेच समर्थ रामदासांचा मठ या सर्वांमुळे चाफळ हे गाव एक पवित्र ठिकाण बनले आहे. राम  मंदिराच्या जवळच विठू आणि तानूबाई यांचे एक छोटेसे घरकुल होते आणि या घरात छोटी कमळा आणि तिचा चिमुकला भाऊ गुण्यागोविंदाने राहत होते पण  प्लेगच्या साथीमध्ये विठू आणि छोटयाचा मृत्यू झाला मग मात्र त्या घरावर जणू काही आभाळच कोसळले आणि लाडात वाढलेल्या कमळाचे मात्र दिवसच पालटले. बाजूच्याच गावात म्हणजे माजगावमध्ये तुकाराम पाटील या मुलाशी तिचा विवाह झाला पण खऱ्या अर्थाने खडतर आयुष्याला सुरवात झाली . घर आणि रामरगाडयामध्ये ती जणू काही जगणेच विसरून गेली

        स्वातंत्र्य संग्रामाचे दिवस चालू होते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारची दहशत सर्वत्र पसरली होती आणि यावेळी कमळाच्या घरात असेच काही तरी चालू झाले .कमळा दिवसेंदिवस धीट बनायला लागली पण घरची जबाबदारी पेलताना तिची तारांबळ उडायला लागली . घरात तीन मुले आणि तीन मुलींचा जन्म झाला . या सहा मुलांना सांभाळताना कमळाला होणारा त्रास तिच्या आईला म्हणजेच तानूबाईला पहावेना त्यावेळी मात्र तिने आपल्या लेकीच्या थोरल्या मुलाला दत्तक घेतले त्यामुळे या दादांची लाडकी जिजी म्हणजे दादांच्या पाठची बहीण सुद्धा आता आपल्या आजीकडे चाफळला आली .परिणामी चाफळ आणि माजगाव दोन्ही घरं एकच झाली .

"दादालाच मोठा लाडू दिला, मला का नाही?" म्हणून सतत गोंधळ घालणारी माझी जिजी ! हो जिजी . जिजी म्हणजे माझी सर्वात मोठी आत्या . जिजी एकूण सहा भावंडात सर्वात तीच मोठी होती त्यामुळे सर्वांची लाडकी ती होती पण त्यामुळे लहानपण खूप आनंदात गेले असे काही नाही कारण अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात जन्माला आलेली गरिबी हा जणू कुटुंबाला लागलेला शाप होता त्यामुळेच तिला  आपल्या आई-आबांना सोडून आपल्या आजीजवळ राहावे लागले परिणामी तिचा स्वभाव प्रमाणापेक्षा जास्त हट्टी झालेला .

 

क्रमशः

 

*✒️सौ.विजया संजय शिंदे*

      *विरार*





 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू