पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शेजारी

शेजारी 

मोरे शेजारी राहायला आले.
पात्र परिचय :- अजय ,दिपा ,मोरे आणि मोरेची पत्नी शिल्पा .

प्रवेश पहिला .
     
        माध्यमवर्गीय कुटुंबाचे घर .मोजके सुबक फर्निचर .

दारावरची बेल वाजवली . किचन मध्ये काम करत असलेली दिपा रुमालाने हात पुसत हॉल मध्ये येते,आणि दार उघडते. अजय आत येतो.
शुरॅक जवळील स्टूल वर बसतो शूज सॉक्स काढतो . बॅग मधील टिफीन काढून दिपाच्या हातात देतो,आणि बॅग जागेवर ठेवतो.
टिफीन घेऊन दिपा किचन मध्ये जात असते.

अजय. :- शेजारी राहायला आले वाटतं.

दिपा. :- हो ss

अजय :- बरचं सामान बाहेर आहे .

दिपा :- हं ss.
अजय :- काय झालं तुला ? आनंद झाला नाही का!

" हुं" करत नाक मुरडत दिपा किचन मध्ये जाते.
 अजय :- आरे! काय हे ! इतके दिवस तर म्हणतं होतीस शेजारी कोणी नाही ,कसं भकास वाटते.चार गोष्टी बोलायला ,शेजार हा पाहिजेच हो ss ! मग, आता काय झालं ?

असे म्हणतं अजय बाथरूम मध्ये गेला .
आत शांतता होती .किचन मधील भांड्याच्या आवाजाने ती भंग झाली.

दिपा :- शेजारी कोण आले , ते माहीत आहे का ?
अजय :- कोण?
बाथरूम मधून अजय टॉवेलने तोंड पुसत बाहेर येत बोलतो.

दिपा :- मोरे ss मोरे ss मोरे आलेत शेजारी राहायला.
त्या लीलायम पार्क मध्ये आपल्या सोबत शेजारी राहत होते . जीव नको नकोसा करून टाकला होता.ही मोरीन बाई ,आता इथे आली सुड घ्यायला.

अजय :- असे काय म्हणतेस ! चांगल्या आहेत की त्या!"

दिपा :- चांगल्या आहेत म्हणे ! आज काय साखर संपली थोडी वाटीभर द्या ना ,काल दळण आणायचे विसरलेच थोड आजच्या पुरतं पीठ द्या बरं दिपा ताई . सारखं काही तरी मगतंच असायची.

 अजय :- किती ओरडतेस ,शांत हो ,चिडू नकोस.

दिपा :- चिडू नको तर काय करू ?

अजय :- अगं! किती चांगल्या आहेत मोरे वहिनी . छान झालं मोरे शेजारी राहायला आले.मला तर खूप आनंद झाला . मोरे, म्हणालाच होता. तुझ्या घरा जवळ येतो राहायला . आमची सारखी सारखी भेटच होतं नाही ग .

इतक्यात दारावरची बेल वाजते.
अजय दार उघडतो.
अजय :- आरे! ये ,मोरे . बरं झालं शेजारीच राहायला आलास.

मोरे :- अरे ! आज आणि उद्या सगळं सामान आवरून होईल. सामानाची मांडा मांड झाली की परवा आपण श्रमपरिहारा साठी बसू . हेच सांगायला आलो होतो . आता येतो .बाय .

असे म्हणून मोरे निघून गेला.

दिपा :- आता कळलं ,तुम्ही एव्हढे खुश का आहात .
( दिपा फनकऱ्यात म्हणाली.)

अजय :- अगं राणी ! तसेच काही नाही आहे ग.
दिपा :- तुम्ही त्या मोरे सोबत ढोसतं बसा , अन् मोरिन माझं रक्त पितं बसणार.

अजय :- अगं ! त्या किती मदत करतात ,तुला .माणसाने चांगुलपणा पहावा म्हणजे तो माणूस आपल्याला चांगला वाटतो.

अजय बोलतं असतो आणि दिपा आत निघून जाते .
जोरात कांहीतरी पडल्याचा आवाज येतो,त्या अवजा मागून दीपाची किंकाळी ऐकु येते.
अजय :- अगं काय झालं !

दारावरची बेल वाजते.अजय दार उघडतो.
मोरे :- काय झालं रे ? जोरात आवाज आला .

अजय :- अरे ही, दिपा पडली .
मोरेंनी लगेच त्याच्या बायकोला आवाज दिला.
शिल्पा ss 

शिल्पा येत विचारते :- काय हो ,काय झालं ?

मोरे :- दिपा वहिनी पडल्यात.
शिल्पा :- बघू .

दिपा थोडी लंगडत हॉल मध्ये येते आणि सोफ्यावर बसते .शिल्पा आत जाऊन तेल आणते आणि दिपाच्या पायाला तेल लाऊन तिचा पायची मसाज करतात.
शिल्पा :- दिपा ताई ,आता बरं वाटतं का ?
 दिपा :- हो 
म्हणतं दिपा थोडी हसते,आणि अजय कडे पाहते . अजय तिला खुणावतो बघ वहिनी किती छान आहेत .
आणि पडदा पडतो.
सौ.प्रज्ञा शशिकांत भारस्वाडकर ,पुणे.


पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू