पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

नको मला मोक्ष नको मला मुक्ती.....

नको मला मोक्ष नको मला मुक्ती

केवळ एक प्यारी मज मातृभूमीभक्ती ll

 

प्रत्येक देहपेशी झिजावी तिच्याचसाठी

प्रत्येक रक्तकणही यावा तिच्याच कामी

प्रत्येक जीवनक्षणही यावा तिच्याच काजी

रक्षिण्या स्वातंत्र्य तीचे प्रभू मला देई शक्ती 

केवळ एक प्यारी मज मातृभूमीभक्ती ll

 

सहस्त्रवार यावे जन्मा तिच्याच पोटी

जन्मोजन्मी यावे मरण तिच्याच साठी

अंतःकाळी यावे तिचेच गीत ओठी

नसावी मला बाकी कशाचीही आसक्ती

केवळ एक प्यारी मज मातृभूमीभक्ती ll

 

            कवी -- अनिल शेंडे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू