पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परिभाषा बदलायला पाहिजे

नुकताच 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन झाला. मला नेहमी प्रश्न पडतो की अमुक व्यक्ती अक्षम किंवा "डिसेबल" आहे हे कशावरून ठरवले जाते? 

म्हणजे, एखादी व्यक्ती चालू शकत नाही.. पण तरी ती सक्रिय राहून स्व- जिद्दीने कर्तृत्व गाजवते. मग ती अक्षम की दोन्ही पाय व्यवस्थित असून देखील बापाचे पैसे पेट्रोल मधे टाकून विनाकारण बाईक चालवणारे दिशाहीन तरुण… किंवा पुढच्या गल्लीतल्या वाण्यापर्यंत पण "स्कूटी" मिरवणाऱ्या मुली अक्षम?? 

एखाद्याला दिसत नाही, म्हणून त्याला आपण दिव्यांग किंवा अक्षम म्हणतो, मग दिवसभर मोबाईल मधे डोकं टाकून बसणारे, कचऱ्याची पेटी बघून सुद्धा कचरा रस्त्यावर टाकणारे, "यहाँ गाडी पार्क करना मना है" वरच गाडी पार्क करणारे, उघडपणे जगात चाललेले अन्याय सुद्धा ज्यांना दिसत नाही ते कोण?? 

एखाद्या मूक माणसाला अक्षम किंवा दिव्यांग म्हणणारे असे कितीतरी लोक बघितले आहे जे स्वतः ला स्वतःच्याच कोषात बंद करून आपल्या माणसांसह संवाद साधायलाच विसरून जातात… ज्यांना आपल्या मित्रांसोबत, भावासोबत… मुलांसोबत बोलण्यासाठी पण शब्द मिळत नाही.. वेळ मिळत नाही! 

खरंच "अक्षम" "दिव्यांग" "डिसेबल" ही परिभाषा बदलायला पाहिजे… .. 

'डोळे' नसले तरी चालेल, पण 'दृष्टी' असायला हवी. 

'पाय' जरी नसले तरी चालेल पण जीवनात 'गती' नसता कामा नये.. 

आणि 'वाणी' नसली तरी चालेल पण 'संवाद' हरवायला नको… 

बघा… पटतंय का?? 

 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू