पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

लाला चे संदेश

लाला चे संदेश

त्याचा पिक्चर येणार आणि वादविवाद होणार हे जणू समीकरण तयार झाले आहे. पण त्याबरोबरच तो समाजाला एक संदेश पण देतो. ( असे त्याला वाटते)  ह्या वेळेला लाला बनून आला आहे.फिल्म बघावी की नाही ते ज्याच्या त्याच्या pocket money वर अवलंबून असते. पण सकल जनचे भले व्हावे यासाठी लाला चे काही संदेश देत आहे आपल्या जबादारीवर ते वाचावे. ( लाला ने डिस्क्लेमर च १० ओळीचा दिला आहे, त्याच्या नवीन फिल्म मध्ये)

लाला चे संदेश

जीवन हे एक पाणीपुरी सारखे आहे, जे समोर आहे ते गपकन तोंडांत टाकणं जरुरी आहे ,नाहीतर काही उपयोग नाही. आणि पाणी पुरीचे प्रवासी pack  कसा असावा आणि हो पाणी वेगळे, आता ते तिखट अन् गोड एकत्र च बर का. ह्याचे एक चांगले उदाहरण दिले आहे. (त्याच्या बरोबर टिश्यू पेपर द्यावा आपले कंपनी चे मार्केटिंग.)

पळणे हे चांगले आहे, पण कुठे आणि कुनामागे पळावे हे कळणे आवश्यक असते. काही कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या मागे विचार न करता पळतात, आणि कुठे थांबावे ते कळत नाही. नेते मध्येच एकडे तिकडे उड्या मारतात.

कुठला पण जॉब करत असतांना, बिझिनेस चे पण ध्यान अन् ग्यान असावे, आणि रिटायरमेंट नंतर काय करावे हैचे प्लॅनिंग पण असावे. पण चालू असलेला जॉब लक्ष्य पूर्वक करावा नाहीतर सगळे मुसळ केरात.

कुठले पण प्रॉडक्ट्स नुसते तयार करून चालणार नाही, तर sales होणे गरजेचे आहे, कुठली स्किम चालू करावी ह्याचे मार्केटिंग द्यान पण लाला देतो. 

Product ला एक चांगले नाव देणे गरजचे आहे, आणि ते नाव जर लेडीज असेल तर, तुमचे प्रॉडक्ट्स चालणारच. आता ह्या तून लाला काय संदेश देतो ते त्यालाच माहीत

परदेशातील दुश्मन उचलुन आणावा आणि त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात आणून, त्यांचे आधारकार्ड काढून त्यांचे पुनर्वसन करावे , असा उच्च विचारप्रवातक संदेश लाला देतो .
ह्या १५ ऑगस्टलाआपले एक सांगणे आहे, सरकारने ते परदेशी असलेलं आपले शत्रू ह्यांना उचलुन आणावे आणि लाला च्या हाती द्यावे.

शाळेतील आपली चांगली मैत्रिण आपल्याला कितीवेळा जरी सोडून गेली तरी आपले प्रेम accept होई पर्यंत हार मानायची नाही. असा प्रेमी युगुलाला संदेश लाला देतो. तो आपल्या जबार दारी वर करावा.
मुलं होण्यासाठी लग्नाची गरज नसते पण मुलं झाल्यावर लग्न करणे गरजेचे असते असा एक बॉलिवूड संदेश लाला देतो.

असो आज इतके संदेश पुरे झाले, नवीन लाला आले की पुन्हा भेटूच.

हेमंत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू